
राजुरा(संतोष कुंदोजवार)-
मध्य चांदा वन विभागाच्या पोंभुरणा वनपरिक्षेत्र अंतर्गत नवेगाव भुजला बिट अंतर्गत येणाऱ्या फिस्कृटी येथील शेतात मादी वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे, चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या मृत्यूच्या घटना संपता संपेना असे झाले असून वनमंत्र्याच्या क्षेत्रात च वाघ असुरक्षित झाल्याने चर्चेचा विषय ठरलेला आहे
बल्हारशाह वनक्षेत्रात तीन वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाला वाघीण बेपत्ताच आहे अश्यातच आज पुन्हा पोंभुरणा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या फिस्कृटी येथील जगदिश गावतुरे यांच्या शेतात वाघ मृतावस्थेत आढळून आला ही माहिती लगेच वनविभागाला देण्यात आली वाघ अंदाजे दोन वर्षे वयाची असून मादी आहे माहिती मिळताच उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू,सहायक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी,पशुवैद्यकीय अधिकारी,बंडू धोत्रे, तसेच इतर वनकर्मचारी घटना स्थळी पोहचून पाहणी केली वाघाचे अवयव शाबूत असून वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट समजले नाही वाघाचे शवविच्छेदन तथा पुढील कार्यवाहिस चंद्रपूरला नेण्यात आले आहे
जिल्ह्यात वाघाच्या सतत होणाऱ्या मृत्यूमुळे वनमंत्र्याच्या जिल्ह्यातच वाघ असुरक्षित कसे झाले ?अशी चर्चा मात्र सुरू आहे
