
- राजुरा(संतोष कुंदोजवार)-
बल्हारशाह वनपरिक्षेत्रात एक वाघाचा बछडा जिवंत तर दोन वाघाचे बछडे मृतावस्थेत आढळून आले होते त्यातील जिवंत परंतु कमजोर असलेल्या बछडा उपचार दरम्यान मृत्यू झाला

मध्य चांदा वनविभाग अंतर्गत बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील क्षेत्रीय कर्मचारी हे कळमणा उपक्षेत्रामध्ये दिनांक 07 सप्टेंबर 2023 ला वनात गस्ती वर असतांना त्यांना नियतक्षेत्र कळमणा मधील वनखंड क्रमांक 572 मध्ये एक अशक्त वाघाचा बछडा दिसुन आला. त्याला तात्काळ रेसक्यु करुन उपचारा करीता वन्यजीव उपचार केन्द्र, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपुर येथे नेण्यात आले होते. तिथे डॉ. कुंदन पोडचलवार, पशुवैद्यकीय अधिकारी यांनी दिनांक 07 सप्टेंबर 2023 पासुन उपचार सुरु केले होते.
सदर बछडा हा खुप अशक्त असल्याने त्याने खाद्य सोडले होते व पाणी सुध्दा पित नव्हता. त्यामुळे सदर बछडयाला सलाईनवर ठेवण्यात आले होते. बछडयाचे रक्तातातील साखरेचे प्रमाण कमी झाले होते आणी Blood urea level व Blood suger level मध्ये वाढ झाल्याचे रक्त चाचणी मध्ये आढळुन आले होते. त्यामुळे सदर बछडा हा उपचाराला प्रतिसाद देत नव्हता. उपचारा दरम्यान दिनांक 09 सप्टेंबर 2023 ला बछडाचा मृत्यु झाला.
मृत बछडाचे शवविच्छेदन वनाधिकारी यांचे समक्ष डॉ. कुंदन पोडचलवार, पशुवैद्यकीय अधिकारी वन्यजीव उपचार केन्द्र, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपुर व डॉ. दिलीप पी. जांभुळे, पशुधन विकास अधिकारी, बल्हारपुर यांनी केले व त्यानंतर मृत बछडाला वन्यजीव उपचार केन्द्र, चंद्रपुर येथे दहन करण्यात आले.