17 दुचाकी चोरणाऱ्या तीन आरोपीना अटक # राजुरा गुन्हे शोध पथक पोलिसांची कारवाई#

352

राजुरा(संतोष कुंदोजवार)-
राजुरा शहरातून दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात तपास करीत असताना तपासा दरम्यान मिळालेल्या माहिती वरून राजुरा पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथकांनी तीन आरोपीना अटक करून 8 लाख 20 हजार रुपये किमतीच्या चोरी झालेल्या 17 दुचाकी जप्त करण्यात आलेले आहे

राजुरा येथे दिनांक 7 सप्टेंबर रोजी फिर्यादी पवन दिनेश वाडगुरे राहणार सोनीयानगर, राजुरायांनी त्याचे मालकीचे हिरो कंपनीची स्प्लेंडर प्रो गाडी पोलीस भरतीची प्रॅक्टीसकरीता ज्योतीबा शाळा राजुरा येथे गेला व शाळेसमोरील गेटसमोर गाडीला हॅन्डल लॉक करून शाळेचे ग्राउंड मध्ये गेला व प्रॅक्टीस करून गाडी ठेवलेल्या ठिकाणी येवुन पाहीले असता त्याला त्याची मोटार सायकल दिसली नाही. तेव्हा त्यांनी गाडीचे आजुबाजुचे परीसरात शोधा-शोध केली कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेल्याची स्पष्ट झाले त्यावरून राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली
फिर्यादीचे तक्रारीवरून ४८६ / २०२३ कलम ३७९ भादवी अन्वये गुन्हा नोंद करून पोलिसांनी तपासात घेतला
सदर गुन्हयातील चोरीस गेलेली मोटार सायकलचा शोध घेणे कामी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा गुन्हे शोध पथकातील प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक धर्मेद्र जोशी, सहायक फौजदार खुशाल टेकाम, पोलिस हवालदार किशोर तुमराम, पोलिस हवालदार सुनिल गौरकार, पोलिस शिपाई महेश बोलगोडवार, रामराव बिंगेवाड, तिरूपती जाधव यांनी परीश्रम घेवुन तीन आरोपींना ताब्यात घेवुन त्यांना अटक करून गुन्हयातील इतर चंद्रपुर जिल्हयातील चोरीस गेलेल्या १६ मोटार सायकल असे एकुण १७ मोटार सायकल एकुण किंमत ८,लाख२० हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केले आहे.
या गुन्ह्यातील अटक केलेल्या आरोपीचे नाव होमेश्वर उर्फ ​​हर्षल नामदेव देवतळे वय २८ वर्ष, राहणार लोनी,
२) मिलींद जयभारत डंभारे वय ३० वर्ष, राहणार लोनी, तालुका कोरपना, ३) अलबास जाऐद शेख वय २४ वर्ष, राहणार देवाडा, तालुका राजुरा, जि. चंद्रपूरअसे आहे

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक रविद्रसिंह परदेशी , अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु ,उपविभागीय पोलीस अधिकारी दिपक साखरे यांचे मार्गदर्शनाखाली राजुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी, सपोनी धर्मेद्र जोशी, सोबत सहायक फौजदार खुशाल टेकाम, पोलिस हवालदार किशोर तुमराम, सुनिल गौरकार, पोलिस शिपाई महेश बोलगोडवार, रामराव बिंगेवाड, तिरुपती जाधव यांनी केली आहे.