
गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षण ची मागणी करीत आहे त्यांना सरकार ने आरक्षण द्यावे मात्र ओबीसी च्या प्रवर्गातून नको अन्यथा ओबीसी समाज पेटून उढेल असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सावली तालुका संघटनेने दिला आहे तसेच आज या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना तहसीलदार मार्फत निवेदन दिले.

मराठा आरक्षण संदर्भात जालना येथे झालेल्या लाठीमाराचा निषेध व्यक्त करीत मराठा समाजाला स्वतंत्र रित्या आरक्षण देण्यास ओबीसी समाजाचा कुठलाही आक्षेप नाही मात्र ओबीसी प्रवर्गातून देण्याचा विचार झाल्यास ओबीसी समाज स्वस्थ बसणार नाही. तसेच मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात येऊ नये अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
यावेळीराष्ट्रीय ओबीसी महासंघ तालुका सावली चे अध्यक्ष कविंद्र रोहणकर,कुणबी समाज अध्यक्ष अर्जुन भोयर,भाऊजी कीनेकर, दिवाकर गेडाम,केशव भरडकर,किशोर वाकुडकर, अनिल म्हशाखेत्री, किशोर घोटेकर,सौ. शोभाताई बाबनवाडे, नितिन पाल,गिरिश चिमुरकर, सुरज बोम्मावार, तुळशीदास भुरसे,नरेश बाबनवाडे,तुळशीराम राऊत, खुशाल भोयर,खोवाजी भोयर,विनोद झाडे,श्रीहरी मोहूरले,सचिन ई़गुलवार,मेहबुब पठान,अतुल जोलमनवार,श्रीकांत बहिरवार,अंकुश भोपये,अशोक श्रीगीरवार,राजु बुरांडे,आकाश बोबाटे,भुजंग आभारे,भैयाजी बोरकुटे, आदी बहुसंख्याने सावली तालुक्यातील ओबीसी बांधव उपस्थित होते.