स्व. वामनराव गड्डमवार जयंती दिनी मोफत आरोग्य तपासणी शिबीर व औषध वितरण कार्यक्रमाचे आयोजन

941

 

गरजुंनी लाभ घेण्याचे केले आवाहन

सावली: सावली तालुक्याचे शिल्पकार, माजी राज्यमंत्री तथा भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीचे संस्थापक अध्यक्ष लोकनेेते स्व. वामनरावजी गड्डमवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावलीच्या वतीने दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था सावंगी मेघे आणि मंडळाद्वारे संचालीत विश्व शांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली, भेंडाळा, कुनघाडा, मारोडा आणि बोथली यांच्या संयुक्त सहकार्याने गुरूवार दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजी सावली येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे सकाळी १० वा. पासुन दुपारी २ वाजता पर्यंत मोफत आरोग्य तपासणी व औषध वितरण तथा प्रगतशील शेतकरी यांचा सत्कार आणि गुणवंत विद्याथ्र्यांचा गुणगौरव कार्यक्रम आयोजीत केला आहे.

 

आयोजीत कार्यक्रमाचे उद्घाटन 7 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी राज्यमंत्री ना. विजयभाऊ वडेट्टीवार यांचे शुभहस्ते होणार आहे.

 

काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा राजुरा क्षेत्राचे आमदार सुभाषभाऊ धोटे यांचे अध्यक्षतेखाली होणा-या या कार्यक्रमास विधान परिषदेचे आमदार अॕड. अभिजीतजी वंजारी, आमदार सुधाकरराव अडबाले, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत आणि संस्थाध्यक्ष संदीप गड्डमवार उपस्थित राहणार आहेत.

 

आयोजीत आरोग्य तपासणी व औषध वितरण शिबीरात सावंगी मेघे येथील जनरल फिजीशियन, बालरोग तज्ञ, दंत रोग तज्ञ, स्त्री रोग तज्ञ, नाक, कान घसा तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, त्वचारोग तज्ञ, सर्जरी तज्ञ उपस्थित राहणार असून शिबिरात ब्लड प्रेशर, ईसीजी, मेमोग्राफी, ब्लड शुगर, सर्व प्रकारच्या रक्त चाचण्या, गर्भवती माता व स्तनदा मातांची तपासणी, बाहय रूग्ण सेवा, त्वचा रोग आजार तपासणी करण्यांत येणार आहे.

 

 

शिबिर काळात विरोधी पक्ष नेते ना. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या विजय किरण फाऊडेंशनद्वारा निर्मित फिरते रूग्णालय व कॅन्सर निदान केंद्र रूग्णाच्या सेवेकरीता उपलब्ध राहणार आहे.

 

आयोजीत आरोग्य तपासणी शिबीराचा आणि आयोजीत जयंती सोहळयाला नागरीकांनी उपस्थित राहावे. अशी विनंती संस्थेचे सचिव राजाबाळ संगीडवार आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. अशोक खोबरागडे यांनी केली आहे.