कविंद्र रोहनकर यांना बेस्ट डायरेक्टर उद्योग रत्न पुरस्कार

231

 

उद्योग मान्यता प्राप्त कविंद्र रोहनकर यांना ग्लोबल स्कॉलर फाउंडेशन पुणे अंतर्गत बेस्ट डायरेक्टर उद्योग रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांना हा पुरस्कार पद्मश्री श्री. गिरीश प्रभूणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

 

ग्लोबल स्कॉलर्स फाऊंडेशनचा मुख्य उद्देश जगभरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना योग्य मान्यता देणे आणि त्यांच्या कार्याची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख करून देणे हा आहे. तसेच सर्व क्षेत्रातील उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी या पुरस्काराची स्थापना करण्यात आली आहे. राज्य भूषण पुरस्कार हा सर्व क्षेत्रातील उत्कृष्टतेला मान्यता देणारा सर्वात आशादायक पुरस्कार आहे. यशाची कबुली देणे, योगदान ओळखणे, प्रयत्नांचे कौतुक करणे आणि विविध क्षेत्रातील योगदानकर्त्यांच्या वाढीचा उत्सव साजरा करणे हा या पुरस्काराचा उद्देश आहे.

या फाउंडेशन च्या वतीने ज्ञान रत्न, उद्योग रत्न, समाज रत्न, सेवा रत्न, विधी रत्न, कृषि रत्न, साहित्य रत्न, कला रत्न, क्रीडा रत्न आणि नारी रत्न अशा विविध कार्य तथा क्षेत्र निहाय पुरस्कार देवून गौरविण्यात येतात.

कविंद्र रोहनकर हे मूळ राहणार थेरगाव ता. सावली जि. चंद्रपुर येथील रहिवासी आहेत.या गावात शेतीचा व्यवसाय करतात.

परंतु शेतीच्या व्यतिरिक्त इतर ही व्यवसायाच्या माध्यमातून स्वयं विकासात्मक तथा भविष्याच्या प्रगतिपथावर पुढे येण्याकरिता व नागरिकांना सेवा देवून आपली आर्थिक उन्नती व्हावी या उद्देशाने त्यांनी सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथे सन १९९६ पासून रोहनकर किराणा स्टोअर्स पासून सुरुवात केली. त्यानंतर सन २००५ ला रोहनकर ट्रेडिंग कंपनी सुरुवात केली, त्यानंतर सन २०१३ मध्ये रोहनकर पेट्रोल पंप सुरु केल आणि सन २०१८ पासून रोहनकर सिमेंट उद्योग सुरू करून आत्मनिर्भर भारत घडविण्यात मोलाचे सहकार्य दिले आहे. घरची कोणतिही व्यापारी, उघोग् पार्श्वभूमी नसतांना, स्व कर्तुत्वाने आपले नाव कमवले व भरभराट केली,उद्योगात व व्यापारात पुढे आले. या माध्यमातून त्यांनी नागरिकांच्या सेवेत सतत तत्पर सेवा देण्याचे कार्य करीत आहेत.

मागील अनेक वर्षापासून त्यांनी तालुक्याच्या नागरिका करिता उपयोगी पडणार्‍या शेतीउपयोग साहित्य, ब्रिक्स कारखाना, सिमेंट वस्तूची निर्मिती करूने,घरगुती साहित्य, घर बांधकाम साहित्य, इलेक्ट्रिक साहित्य, चारचाकी व दुचाकी साहित्य, तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविणे अशा निरनिराळ्या पद्धतीने सेवा देण्याचे कार्य करीत आहेत. या सर्व कार्यांची दखल घेत त्यांची पुरस्कार करिता निवड करण्यात आली. सदर निवड ही विदर्भातून चंद्रपुर जिल्हया मधून त्यांची निवड करण्यात आली. सदर पुरस्कार सन्मान सोहळा ग्लोबल स्कॉलर फाउंडेशन पुणे च्या वतीने सय्याजी हॉटेल पुणे येथे आयोजित करण्यात आले होते. यामध्ये चंद्रपुर जिल्ह्यातील सावली तालुक्याचे कविंद्र रोहनकर यांना बेस्ट डायरेक्टर उद्योग रत्न या पुरस्काराने पद्मश्री श्री. गिरीश प्रभूणे यांच्या हस्ते पदक, ढाल आणि प्रशस्तीपत्रक देवून गौरविण्यात आले. त्यांना मिळालेल्या पुरस्काराने त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केल्या जाते आहे.