वाघाने केला गुरख्यावर हल्ला;गुराखी जखमी

786

 

सावली तालुक्यातील जिबगाव येथील गुराखी रामदास बोरकुटे हे नेहमी प्रमाणे गावातील गाई- बैल चराई करण्याकरिता नेले असता. दबा धरून बसलेल्या वाघाने बोरकुटे यांच्या वर हल्ला केले असता ते जखमी झाले असून या घटनेची माहिती गावात मिळताच गावातील नागरिकांनी घटना स्थळावर धाव घेतली व जखमीला उपचारा करिता येथील सावली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता आणण्यात आले असून सदर व्यक्ती वर उपचार सुरु आहे .

सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत व्याहड खुर्द उपवनक्षेत्रातील शिर्शी बिटातील जीबगाव येथे घटना घडली. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे. सदर घटनेचा पंचनामा करण्याकरिता शिर्सी बीटाचे वनरक्षक मुंडे यांनी जखमीची भेट् घेत जखमीला उपचार करिता दाखल केले.

त्यावळी ग्रा प सरपंच पुरुषोत्तम चुदरी, उपसरपंच इंदिराताई भोयर,ग्रा प‌‌‌ सदस्य राकेश गोलेपल्लीवार, ग्रा प सदस्य मोनिका उडिरवाडे, ग्रामीण रुग्णालयात भेट देत तब्येतीची विचारपूस करण्यात आली त्यावेळी उपस्थित राकेश नागापुरे सुनिल किनेकार अंकुश बोरकुटे उपस्थित होते.