पावसामुळे अस्वलांनी घेतला प्रवासी निवाराचा आधार

1888

 

अंतरगाव(पंकज कागदेलवार) सावली वन परिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या पाथरी उपवनक्षेत्रातील मेहाबुज, भानापूर,पालेभाडसा,पाथरी या चौरस्तावरील भानापूरचा असलेला प्रवासी निवारामध्ये चक्क तीन अस्वल पावसामुळे आधार घेत असल्याचे दिनांक 20 ला चा रात्रौ दोन वाजताच्या दरम्यान आढळून आले.

सावली तालुक्यातील युवक काँग्रेसचे युवा नेते पंकज कागदेलवार, माजी पंचायत समिती उपसभापती राजेंद्र भोयर,दिनेश मुद्दमवार हे चंद्रपूर येथे विरोधी पक्ष नेते ना. विजय वडेट्टीवार यांचा सत्कार सोहळ्यासाठी गेले होते. तेथून परत येत असताना पाथरी वरून मेहा बुज चा चौरस्त्यावर असलेल्या भानापूर चा प्रवासी निवाऱ्यात चक्क तीन असल्याचे त्यांना दिसून आले.

 

त्यानंतर त्यांनी लगेच पुन्हा मागे वळून संबंधित तीनही अस्वली हे प्रवासी निवाराच्या आडोशाला असल्याचे दिसून आले. त्यादरम्यान पावसाची चांगली सुरुवात होती त्यामुळे पावसामुळे या असलेल्या प्रवासी निवार्याच्या आधार घेतल्याचे यावेळी दिसून आले या संदर्भातून संबंधित विभागाला सुद्धा त्यावेळी त्यांनी माहिती दिली या परिसरात मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी असल्याचे दिसून येत आहे.मात्र पावसाळ्यात अनेक प्राण्यांना त्रास होत असल्याचे या निमित्ताने दिसून आले.