अस्वलीच्या हल्यात  शेतकरी गंभीर जखमी

240

राजुरा(संतोष कुंदोजवार)

राजुरा तालुक्यातील विहिरागाव येथील शेतकरी गंगाधर शेंडे वय 60 वर्ष हा जंगलालगत च्या शेतात गेला असता अस्वलिने अचानक हल्ला करून गंभीर जखमी केले रुग्णास प्रथम राजुरा उपजिल्हा दवाखान्यात आणण्यात आले परंतु गंभीर जखमी असल्याने चंद्रपूर ला हलविण्यात आले आहे.

 

ही घटना आज दिनांक 20 आगट रोजी सकाळी घडली घटनास्थळ राजुरा वनपरिक्षेत्र अंतर्गत चणाखा नियतशेत्रातील कक्ष क्रमांक 160 मधे घडली असून माहिती मिळताच वनरक्षक गीता चव्हाण,संजय सुरवसे,वनमजूर लटारू रोहणे जखमीस दवाखान्यात भरती केले वनविभागाकडून तात्काळ उपचार मदत म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड यांनी जखमींच्या मुलास 5 हजार रुपयाची आर्थिक मदत दिली आहे पुढील तपास वनकर्मचारी करीत आहे