अट्टल दुचाकी चोरट्यास सावली पोलिसांनी पडकले;8 दुचाकी जप्त;सावली पोलिसांची उत्तम कामगीरी

3594

पोलीस स्टेशन सावली येथे दिनांक 17/08/23 रोजी अपराध क्रमांक 171/23 कलम 379 भा द वी अन्वये मोटरसायकल चोरीचा गुन्हा नोंद आहे. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी करण महेश चेरकुरवर वय 19 वर्ष  रा इंदाला गडचिरोली याला ताब्यात घेऊन कसून चौकशी/विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सदर आरोपी व त्याचा विधिसंघर्शित साथीदार रा.गडचिरोली असे मिळून गडचिरोली व सावली परिसरात मोटरसायकल चोरी करतात. अद्याप नमूद आरोपी व त्याचा साथीदार यांचेकडून व यांनी ज्यांना मोटरसायकल विकल्या त्यांचेकडून एकूण 08 मोटरसायकल जप्ती केल्या असून अजून काही मोटरसायकल recover होण्याची शक्यता आहे.

 

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी , अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू , उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार आशिष बोरकर यांचे नेतृत्वात पोलिस हवालदार दिलीप मोहूरले, संजय शुक्ला , पोलिस नाईक मोहन दासरवर, धीरज पिदुरकर, विजय कोटणाके, चंद्रशेखर गंपलवार यांनी केली.