कोरोना काळातील ग्रामपंचायत स्तरावरून थकीत दरमहा हजार रु.देण्याची आयटक ची मागणी

801

सावलीत आशा व गट प्रवर्तक संघटनेचा तालुका मेळावा संपन्न.

 

सावली(तालुका प्रतिनिधी)-कोविड -19 संदर्भात कोरो नाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता प्रशासना मार्फत आशा वर्कर व गट प्रवर्तक यांना कोविड-19 च्या अनुसंगाणे विशिष्ट जबाबदारी निश्चित करून देण्यात आली होती.

 

जिल्हा स्तरावरून दिलेल्या आदेशानुसार त्यांचे कार्यक्षेत्रात आशा व गट प्रवर्तक हे आपली कर्तव्य ग्राम पंचायत स्तरावर ,गाव स्तरावर पार पाडलेली आहेत.अहोरात्र मेहनत घेऊन जीवाची पर्वा न करता कोविड शी निगडित ईतर कामे केलेली आहेत. आशा व गट प्रवर्तक यांना मिळणाऱ्या मानधन व्यतिरिक्त दरमहा रु.हजार इतकी प्रोत्साहन पर रक्कम अदा करणे बाबत दि.31 मार्च 2020 व 4 जून 2020 अन्वये शासन स्तरावरून कळविण्यात आले होते.त्यानुसार गाव स्तरावर काम करणाऱ्या आशा व गट प्रवर्तक यांना प्रोत्साहन पर भत्ता म्हणून कोरोना काळातील दरमहा रु हजार अदा करण्यात यावे असे मा.मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी दि.28 सप्टेंबर 2022 व 21 जून 2023 नुसार आपल्या अधिनिस्त असलेल्या सर्व ग्राम पंचायतिला आदेशित केले होते.

 

परंतु आता पर्यंत या आदेशाची कुठेही अमलबजावणी झाली नाही तसेच आयुष्मान भारत योजने अंतर्गत सुध्या केलेल्या सर्वेचे प्रती कुटुंब 10 रू.नुसार मोबदला व कुष्ट रोग सर्व्हे चे पैसे ग्राम पंचायत स्तरावरून देण्यात आले नाही त्यामुळे संतप्त झालेल्या आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांनी कॉ.विनोद झोडगे राज्य सचिव आयटक व कॉ .कल्पना रायपुरे तालुका अध्यक्ष शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन यांच्या मार्गदर्शनात स्थानिक पंचायत समिती सभागृहात तालुका स्तरीय मेळावा आयोजित केला व आपल्या अनेक समस्यांचा पाढा वाचला यानंतर मा . गट विकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांना निवेदन देऊन तातडीने कोरोना काळातील ग्रामपंचायत स्तरावरून देण्यात येणारे थकीत दरमहा रु हजार व आयुष्मान भारत योजने अंतर्गत सर्व्हेचे , आभा कार्डचे पैसे,कुष्ठ रोग सर्व्हेचे पैसे देण्यासंबंधी ग्राम पंचायतिला आदेशित करावे अशी मागणी करण्यात आली.यावेळी गट विकास अधिकारी यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे मान्य केले .

या शिवाय सदर मेळाव्यात विना मोबदला कामे करणार नाही,सरकार द्वारे अँड्रॉइड मोबाईल ,मुबलक नेट पॅक रिचार्ज दिल्या शिवाय कोणतेही ऑनलाईन कामे करायची नाहीत असा सामूहिक निर्णय घेत त्या अनुषंगाने निवेदन मा.तालुका आरोग्य अधिकारी यांना देण्यात आले.यावेळी जिल्हा अध्यक्ष कॉ.विनोद झोडगे,तालुका अध्यक्ष कॉ. सुहासनी वाकडे,सचिव कॉ.संगीता गायकवाड, मंदिरा देवतळे, वर्षा भांडेकर,ललिता वाकडे,विद्या ब्राम्हणवाडे,सुषमा उमरे ,कविता गेडेकर,प्रीती मेश्राम,सोनी राजूरकर,चंद्रकला कुळमेथे,मनीषा नैताम,ज्योती गोवर्धन,निता भांडेकर उपस्थित होत्या.

मेळाव्याचे संचालन वर्षा भांडेकर तर आभार सुहासनी वाकडे नी मानले यावेळी तालुक्यातील शेकडो आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचारी उपस्थित होते.