कसरगाव ते नदीघाट रस्त्याची दयनीय अवस्था; रस्त्याचे काम केव्हा होणार;शेतकऱ्यांचा प्रश्न

362

सावली तालुक्यातील कसरगाव येथील नदीघाट पादण रस्त्यांच्या कामांची सूरवात नरेगा मार्फत 2014ला झाली तेव्हा पासून सर्व शेतकऱ्यांना व मजूरांना शेतीच्या कामाच्या वेळेस हे 3 किमी चे अंतर टोगरा भर चिखला मधून ये -जा करावी लागत आहे.

 


गावकऱ्यांनी वारंवार तक्रार करूनही लोकप्रतिनिधी सह ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य लक्ष देत नाही. या ठिकाणी रस्ता नसल्याने शेतकऱ्यांना हंगामात मोठा त्रास सहन करावा लागत आहे परंतु या समस्येकडे कुणीच लक्ष देत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून यावर्षी तरी रस्ता होणार का असा संतप्त सवाल शेतकरी करीत आहे.