लहान मुलांनी वाचविला बैलाचा जीव ;असोलामेंढा नहारात पडले होते बैल

778

सावली तालुक्यातील चिचबोळी येथील लहान मुलांनी गोसीखुर्द च्या आसोलामेंढा नहर मध्ये पडलेल्या बैलाला एक तासाच्या अथक परिश्रमा नंतर वाचविण्यात यश आले.

आसोलामेंढा नहर सध्या पाण्याने अथांग भरून वाहत आहे, वन्यजीव किंवा कोणताही प्राणी या नहर मध्ये पडला तर त्याला बाहेर निघने अशक्य आहे. आज याच नहरात बैल पडले व त्याला बाहेर निघता येत नसल्याने स्वत:चे प्राण वाचवण्यासाठी त्या बैलाची तळमळ सुरू होती, हे चिचबोडी येथील लहान मुलांच्या लक्षात आले तेव्हा प्राणी प्रेमापोटी त्या लहान बाल गोपालांनी 1 तासाच्या अथक प्रयत्ना नंतर त्या बैलाला सुरक्षीत पणे बाहेर काढले. लहान मुलांमधील प्राण्यांविषयीचे प्रेम व आपुलकीने चिचबोडी येथील त्या सर्व लहान मुलांचे कौतुक केल्या जात आहे.