नदीत बुडून युवकाचा मृत्यू;आंघोळ करणे जीवावर बेतले

390

 

ब्रम्हपुरी तालुक्यातील भालेश्वर येथील vainganga वैनगंगा नदीपत्रात अंघोळीकरिता गेलेला yuvak युवक बुडल्याची धक्कादायक घटना दि.१६ऑगष्ट ला सकाळी ७ च्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार मृतक गोपाल अरुण नाकतोडे २१वर्ष रा.चिखलगाव हा आपले भाऊजी यशवंत अरुण ठेंगरी रा. कुर्झा वार्ड ब्रम्हपुरी यांचे समवेत काही मुलांसोबत अधिक मासाची पूजा विसर्जन करण्याकरिता दि.१६ ऑगष्ट ला सकाळी ६ च्या सुमारास भालेश्वर येथील वैनगंगा नदीपात्रात आले होते.

 

विधिवत पूजा झाल्यानंतर मृतक गोपाल अंघोळीला गेला असता नदीपात्रातील अंदाज न आल्याने नदीत बुडाला असून बाहेर न निघाल्याने याची माहिती पोलीस प्रशासनाला देण्यात आली.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली मात्र २ तासाच्या शोधमोहिमेनंतर युवकाचा शोध लागला नाही त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण केले असून युवकाचा शोध घेणे युद्धपातळीवर सुरू आहे.

 

त्यात यश मिळाले असून सायंकाळी ६.००वाजताचे सुमारास युवकाचे मृतावस्थेत प्रेत आपत्ती व्यवस्थापन पथकाला मिळाले असून उत्तरणीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे आणले असता सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सुधाकर आंबोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रम्हपुरी पोलीस करत आहेत.