
सावली तालुका काँग्रेस कमिटी मित्रपरिवारातर्फे भव्य नागरी सत्कार

सावली (सूरज बोम्मावार)
“माझा सारख्या सामान्य कार्यकर्त्याला दुसऱ्यांदा विरोधी पक्षनेते पद मिळणे हे सामान्य कार्यकर्त्याचा कष्टाचा सन्मान आहे,राज्यातील सरकार हे जनता विरोधी असल्याने येत्या काळात काँग्रेस सत्तेवर येणार आहे,सध्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे इडीच्या भीतीने सत्तेत सामील झाले मी सर्व समाजाच्या विकासासाठी पुढाकार घेत राहील, माझा लढा ओ.बी.सी च्या न्याय व हक्कासाठी निरंतर असणार आहे, लवकरच राज्यभरात दौरा काढून ओ.बी.सी समाजाच्या समस्या समजून घेण्यात येईल.काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आतापासून कंभर कसून कामाला लागा असे म्हणत हा सत्कार माझ्या जीवनात अविस्मरणीय क्षण राहील असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते, आमदार.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी नागरी सत्कार समारोहात केले.
विरोधीपक्षनेते झाल्यानंतर प्रथमच आपल्या ब्रम्हपुरी-सावली विधानसभा क्षेत्रातील सावली तालुक्यात भेट दिली त्यांचा प्रथम आगमना प्रित्यर्थ सावली तालुका काँग्रेस कमिटी व विजयभाऊ मित्रपरीवारतर्फे त्यांचा भव्य नागरी सत्कार निखिल सुरमवार व्याहाड खुर्द यांच्या मैदानावर भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता.
#पडद्यामागच्या हिरो ‘निखिल’#
हा भव्य दिव्य कार्यक्रम जरी तालुका कांग्रेस कमेटी व मित्र परिवार असला तरी या कार्यक्रमाचा खरा सूत्रधार हा कांग्रेस युवा नेता तथा बाजार समिती चा संचालक निखिल नरेश सुरमवार होता. ना.विजय वडेट्टीवार यांनी सत्कार कार्यक्रम ला होकार देताच तब्बल 8 दिवसात संपूर्ण टीम म्यानेज मेंट च्या माध्यमातून आणि आपल्या लाडक्या नेत्याचा काही तरी हटके सत्कार करण्याची कल्पक बुद्धी वापरून त्यांनी लाखो रुपये उधळीत *’न भूतो न भविष्यती’* असा सोहळा पार पाडला मात्र एवढं होवूनही तो मात्र स्टेज वर मिरवला नाही.त्याच्या कार्याचे सर्वत्र कौतुकही झाले.
#खाजगी सुरक्षा रक्षकांनी अनेकांना दिला धक्का#
ना.विजय वडेट्टीवार यांना शासनाची सुरक्षा आहे मात्र त्यांची खाजगी सुरक्षा रक्षकांच्या गराडा हा अधिक दिसतो.या सुरक्षा रक्षकांनी तालुक्यातील अनेक नेत्यांना धक्का दिला तसेच अनेक पदाधिकारी यांना स्टेजवर जाण्यापासून रोखले त्यामुळे हिरमुसले चेहऱ्यांनी अनेक जण खालीच बसने पसंद केले.तर अनेक जण स्वागत साठी हार,गुच्छ घेवून उभे होते मात्र त्यांनाही या रक्षकांचा चांगलाच फटका बसला त्यामुळे काही जण निघून गेल्याचेही दिसले.
या कार्यक्रमाला नागपूर शिक्षक विधानपरिषद आमदार सुधाकर अडबाले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव व गडचिरोली- चिमूर लोकसभा समन्वयक नामदेव किरसाण, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संदीप पाटील गड्डमवार,माजी बांधकाम सभापती जि.प. दिनेश पाटील चिटणुरवार, सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहणे, महिला तालुका अध्यक्षा सौ.उषाताई भोयर,जेष्ठ नेते प्रशांत गाडेवार,
माजी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजूभाऊ सिद्धाम,माजी प.स.सभापती विजय कोरेवार,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हिवराज पाटील शेरकी, न.पं.सावलीच्या नगराध्यक्षा सौ.लता लाकडे, उपनगरध्यक्ष संदीप पुण्यपकार,नरेश सुरमवार,सरपंच संघटनेचे अध्यक्ष पुरषोत्तम चुदरी,रोहीत बोम्मावार, अमोल नाडेमवार, युवा नेते निखिल सुरमवार, नरसिंग गनवेनवार,युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष किशोर कारडे,सावली शहर अध्यक्ष अमरदीप कोनपत्तीवार,सावली शहर महिला अध्यक्षा सौ.भारती चौधरी, व्याहाड खुर्दच्या सरपंच सौ.सुनीता उरकुडे, उपसरपंच सौ.भावना बीके, अनिल म्हशाखेत्री,अनिल गुरुनुले,दीपक जवादे,सुनील बोमनवार,आशिष मनबतुलवार,दिवाकर काचीनवार,आशिष पुण्यपवार,संजय मजोके, तसेच सावली तालुका,शहर व ग्रामीण काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी,सावली नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक- नगरसेविका व कार्यकर्ते व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.