
तोहोगाव, प्रतिनिधी
मेरी मीट्टी मेरा देश अभियान अंतर्गत लाठी येथील कर्मवीर विद्यालयात विविध उपक्रम राबविण्यात येऊन आपण आणि आपली माती विषयी गावातून जनजागृती फेरी काढून सांगता करण्यात आली
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत यावर्षी सर्व शासकीय अशासकीय संस्थेत विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रम अंतर्गत गोंडपीपरी तालुक्यातील लाठी येथील कर्मवीर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे पंचप्राण सामूहिक शपथ घेण्यात आली तसेच वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा,घोष वाक्य स्पर्धा, निबंध स्पर्धा,तृणधान्य पिकाचे आरोग्यवर्धक फायदे याची माहिती आदी कार्यक्रम घेण्यात आले आज दिनांक 12 आगस्ट रोजी गावातून घोषवाक्य म्हणीत विद्यार्थ्यानी प्रभातफेरी काढून कार्यक्रमाची सांगता केली
पाच दिवस असलेल्या या उपक्रमास मुख्याध्यापिका सुधा वासाडे यांचे मार्गदर्शनात ,सहायक शिक्षक चंद्रकांत आसुटकर,लक्ष्मी कडते,नरेंद्र ताजने,सतीश मेश्राम, अंकुश वनमाळी,वामन मोरे, अरुण नक्षीने, सुरेश पिंपळशेंडे,संतोष कुंदोजवार,सुरेश लोखंडे आणि सुरेश खेडेकर, किशोर देवाडकर आणि विद्यार्थी ,विद्यार्थिनी परिश्रम घेतले
