
#Near Pathari Forest Tigers Attack# सावली saoli तालुक्यातील pathari पाथरी उपवनक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या उसरपार चक येथील सुरेश दाजगाये या शेतकऱ्यांवर आज 12वाजता सुमारास म्हशी राखत असतांना tiger वाघाने attackहल्ला करून गंभीर जखमी केले. त्यांना पाथरी व नंतर gadchiroli गडचिरोली येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठविले आहे.

सावली तालुक्यात सद्या वन्य प्राण्यांचा धुमाकूळ सुरू आहे.वाघ,बिबट चा हल्ला रोजच सुरू असून अनेक जनावरे फस्त करण्याचे काम सुरू आहे अशातच दोन दिवसांपासून हत्ती चे आगमन झाले आहे. याच विवेनचनांत असताना या परिसरातील शेतकरी हे ग्रुप ने जनावरे राखत आहे.आज उसरपार येथील 7 ते 8 शेतकरी एकत्र येऊन नवीन नहरावर स्वमालकीचे मशी चरायला नेले असता वाघाने या गुरांच्या कळपावर हल्ला करीत त्यात शेतकरी सुरेश दाजगाये त्याच्यावर जोरदार प्रहार केला व त्यात त्यांना गंभीर जखमी केले.वाघाच्या हल्ल्यामुळे सोबत असलेल्या शेतकऱ्यांनी त्या वाघाला परतवून लावत जखमी शेतकऱ्याला पाथरी येथे आरोग्य केंद्रात भरती केले.पाथरी उपवन क्षेत्राला माहिती देण्यात आली.कर्मचारी लगेच घटनास्थळी आले.गंभीर जखमी शेतकऱ्यांला मोठ्या प्रमाणात मार असल्याने त्याला गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
सद्या या परिसरात वन्य प्राण्यांचा मोठा धुमाकूळ असल्याने नागरिक चिंता ग्रस्त आहे.त्यामूळे वाघांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.