बेलगाव-नवेगाव रस्ता झाला खड्डेमय;नागरिकांना प्रवासासाठी होतोय मोठा अडथळा

120

सावली(सूरज बोम्मावार)
नवेगाव आणि राजोली या दोन्ही गावांतील नागरिकांना दररोज चा जिवघेणा प्रवास करावा लागतो आहे.बेलगांव-नवेगाव हा रस्ता पुर्ण खड्डामय झालेला असून जनतेला प्रचंड नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

स्थानिक पदाधिकारी , लोकप्रतिनिधी आणि पुढारी यांचे याकडे लक्ष नाही.जनता दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहे कारण नवेगाव व राजोली या दोन्ही गावांतील जनतेला व्याहाड खुर्द,सावली,गडचिरोली येथील बाजारपेठेत, शिक्षणासाठी, व्यवसायासाठी, आरोग्यासाठी हा एकच रस्ता असल्याने प्रचंड त्रास होत आहे.

 

गोसीखुर्द धरणाचं कालवा ची कामे करणारी कंपनी नवेगाव येथे आहे त्यांच्या रेतीच्या जड वाहणांने रस्ता पुर्ण पणे खड्डे मय झालेला आहे.याकडे कुणाचेही लक्ष नाही.जबाबदार जागृत लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालून रस्ता पुर्ण बनवून द्यावे व जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.