युवा कलाकारांनी साकार केलेला ‘नक्षा’ 15 आगस्ट पासून प्रदर्शित

114

केवळ स्वप्न पाहून ते पूर्ण होत नसतात, त्यासाठी प्रयत्नाची गरज असते, काही काही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी वेडे व्हावे लागते, वेळ काढावी लागते आणि त्यातूनच मग स्वप्नपूर्तीचा आनंद मिळतो, अगदी परिस्थिती विपरित असली तरी, यश गाठता येते. यशस्वी होता येते. अशाच स्वप्नपूर्तीच्या ध्येयाने वेडा झालेल्या मात्र प्रापंचिक व्यवसायातून वेळ मिळत नसतानाही, पाहीलेले स्वप्नपूर्तीच्या दिशेने यशस्वी वाटचाल करणारा युवक म्हणजे प्रफुल्ल यलचलवार!

 

चित्रपट निर्मीती म्हणजे, मुंबई!, चित्रपट निर्मीती म्हणजे लागणारा पैसा! मात्र प्रफुलने स्वत:चा चित्रपट तयार करण्यांचे स्वप्न पाहीले, आपल्या गावातीलच संवगड्यांना सोबत घेत, आपल्याच परिसरात शुटींग करीत एका नव्या चित्रपटाची निर्मीती केली आणि सिनेमाचे नांव ठेवले ‘नक्शा’

 

मूल परिसरातच शुटींग झालेले, आणि ​स्थानिक कलावंताना सोबत घेवून तयार केलेली शार्ट फिल्म नक्शाचे काम पूर्ण झाले असून, नुकतेच त्याचे ट्रेलरही युटयूबवर प्रदर्शीत करण्यात आले आहे. स्वातंत्रदिनांचे औचित्य साधत, येत्या 15 आॅगष्टला युटयूबवर नक्शा प्रदर्शीत होणार आहे.

 

श्री बाबा आर्ट अँड प्रोड्कॅशन निर्मित NAKSHA (An unexpected journey) हिंदी शॉर्ट फिल्मचे निर्देशक व निर्माता-प्रफुल एम.यलचलवार, लेखक-शुभम येवतकर, कलाकार चाईल्ड आर्टिस्ट कार्तिक कमलापूरवार, सह कलाकार प्रफुल एम.यलचलवार, शुभम येवतकर, मारोती जराते, गणेश मंथनवार, कुणाल गायकवाड, कु. कुमुद भोयर, प्रा.सरिता बुटले, धनंजय.पी. बद्देलवार, अमोल गेडाम, सचिन गेडाम, आशुतोष सादमवार व इतर सहकारी या चित्रपटात आपल्याला दिसणार आहे.

 

“नक्शा” ट्रेलर पाहण्यासाठी क्लिक करा https://youtu.be/Wl8sbzRmH9c