
सावली (सूरज बोम्मावार)
सावली तालुक्यातील गेवरा व परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली असून रस्त्यावरील खड्डयामुळे आज सायंकाळी गेवरा ते विहिरगाव या रोड वरून सागर शहा यांची गाडी पलटी होऊन ती सरळ शेतात घुसली सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.मात्र या रस्त्यावरील खड्डे हे कुणाची जीव घेण्याची वाट पाहत आहे का असा संतप्त सवाल या परिसरातील नागरिक करीत आहे.

गेल्या दोन-तीन वर्षांपासून या रस्त्यांची दयनीय अवस्था आहे.या रस्त्यावर डागडुगी करण्यासाठी वेळ ही जीप च्या बांधकाम विभाग यांना आहे.या संदर्भात अनेकदा नागरिक तक्रारी करूनही जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे चे मुजोर अधिकारी या कडे ढुंकून ही पाहत नाही आहे.या रस्त्या बद्दल या क्षेत्रातील आमदार व खासदार हे दोघेही लक्ष देत नसल्याने जनतेमध्ये नाराजी आहे.
रस्ता का खराब झाला?
गेले 3 वर्ष बोरमाळा या नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन करण्यात येत होते व त्याची वाहतूक ही दिवस रात्र सुरू होती.त्यामुळे रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडले.रेती वाहतूक सुरू असतांना नागरिकांची ओरड लक्षात घेत काही अपवादात्मक दिवस ठेकेदाराने खड्यात मुरूम टाकला मात्र आता खड्डे एवढे मोठे आहेत की प्रवास करणे ही कठीण झाले आहे मात्र या कडे कुणी देणार की नाही असा संतप्त सवाल या परिसरातील नागरिक करीत आहे.