वादग्रस्त व बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करा

258

 

सावली,

संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी यांनी आपल्या थोर पुरुषांबद्दल अतिशय खालच्या दर्जाच्या भाषेत बोलून त्यांचा अवमान केला. त्यांनी सामाजिक क्रांतीचे प्रणेते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बद्दल अवमान जनक व्यक्तव्य केले. तसेच राजा राममोहन राय व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल सुद्धा वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे थोर महापुरुषांना मानणाऱ्या महाराष्ट्रातील बहुसंख्य वर्गाच्या भावना दुखावल्या आहेत. आपल्या महापुरुषांचा वारंवार अपमान करत समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न संभाजी भिडे करीत आहे. बहुजन महापुरुषांच्या नावाने युवकांची मती भडकवून आमच्याच लोकांना एकमेकांच्या जातीविरोधात उभे करणे आणि त्यांच्यामध्ये दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न भिडे करीत आहेत.
त्यामुळे आपल्या थोर महापुरुषांविषयी वादग्रस्त व बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी याचा सावली तालुका माळी समाज संघटनेच्या वतीने महात्मा फुले चौकात निषेध करण्यात आला. भिडे वर तात्काळ कारवाई करणेबाबत मा. मुख्यमंत्री यांना तहसीलदार सावली यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. तसेच भिडेला तात्काळ अटक करावी अशी मागणी पोलीस स्टेशन सावली येथे करण्यात आली. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला.
यावेळी सावली तालुका माळी समाज संघटनेचे अध्यक्ष श्री अतुलभाऊ लेनगुरे, उपाध्यक्ष सुरेश ढोले व रोशन गुरनुले, सचिव प्रवीण ढोले, कोषाध्यक्ष योगेंद्र आदे, प्रसिद्धी प्रमुख मनोज चौधरी व संघटनेचे सदस्य भोगेश्वर मोहुर्ले, सुनील ढोले, विकास चौधरी, राजू सोनुले व संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच नगरसेविका साधनाताई वाढई, शारदाताई गुरनुले, नीलमताई सुरमवार, नगरसेवक नितेश रस्से, भारतीताई चौधरी, संजय कावळे, देवराव मोहुर्ले, भूषण गुरनुले, जितेश शेंडे, आशिष कार्लेकर, अंबादास गुरनुले, राहुल जेंगटे, सुरज गुरनुले, मयूर गुरनुले, दिपक चौधरी, रोहित गुरनुले, सोनू गुरनुले व बहुसंख्येने सावली तालुक्यातील माळी समाज बांधव उपस्थित होते.