कृषी सहाय्यक अधिकारी संजीव दमके यांचे अपघाती निधन

3551

 

सावली येथील रहिवासी संजीव उर्फ़ गुड्डू दमके हे कृषी विभाग सिंदेवाही येथे agriculture कृषी सहहायक पदावर कार्यरत असतांना आपले कामे आटोपून ते सावली कडे येत असतानाच पेंढरी गावाजवळ त्यांच्या  दुचाकीला रानटी डुक्कर जोरदार धडक दिली त्यात ते बाजूला फेकले गेले व त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली.

 

#accident#अपघात झाल्यानंतर काही वेळात माहिती मिळताच पेंढरी येथील पत्रकार लखन मेश्राम यांनी घटनास्थळी धाव घेत बघीतले असता त्यांना जखमी दमके यांची ओडख पटली व त्यांनी या बाबत पोलिसांना व घरी माहिती दिली.

 

त्यानंतर जखमी दमके यांना सावली येथील आणण्यात आले व नंतर चंद्रपूर येथे भरती करण्यात आले मात्र त्यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सावलीत शोककळा परसली असून एक चांगला युवा कर्मचारी गेल्याने दुःख व्यक्त केल्या जात आहे. संजीव दमके यांचा मागे आई,पत्नी,मुले, बहीण असा बराच मोठा आप्त परिवार आहे.आज दुपारी सावली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.