वीज पडून रोपवन मजुरांचा मृत्यू #गोंडपीपरी तालुक्यातील चीवंडा वनक्षेत्रातील घटना#

959

राजुरा(प्रतिनिधी)-
करंजी उप वनक्षेत्राचे चिवडा कक्ष क्रमांक 138 मध्ये रोपवन कामावरील मजुरांवर वीज पडल्याने जागीच ठार झाल्याची घटना घडली असून इतर एक मजूर जखमी झाल्याचे समजते गोविंदा लिंगा टेकाम असे मृतकाचे नाव आहे
कोठारी वनपरिक्षेत्र अंतर्गत करंजी उपक्षेत्राच्या चीवंडा नियतक्षेत्र कक्ष क्रमांक 138 मध्ये रोपवणाचे कामे सुरू होते दरम्यान वादळी पाऊस आल्याने काही मजूर एका मोठ्या झाडाखाली थांबले आणि अचानक या झाडाला स्पर्श करीत गोविंदा लिंग टेकाम यांचे अंगावर वीज पडली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला
यावेळी इतर मजूर लांब अंतरात दुसऱ्या झाडाखाली थांबले होते विशेष म्हणजे घटनेच्या 20 मिनीटपूर्वी पाऊस तिथे येऊन गेला काही विश्रातीनंतर परत आलेल्या पावसात वीज पडून ही दुर्दैवी घटना घडली आहे मोक्यावर वनकर्मचारी असून पोलीस व महसूल कर्मचाऱयांना याची माहिती दिली आहे