कोरपना तालुक्यातील बीबी गावाजवळ बस पलटी #सुदैवाने सर्व सुखरूप#

396

राजुरा(संतोष कुंदोजवार)-

कोरपणा तालुक्यातील बीबी गावाजवळ आज रात्री 8.15 वाजता राजुरा ते विरूर गाडेगाव जाणारी महामंडळाची मुक्कामी बस पलटी झाल्याची घटना घडली असून सुदैवाने कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही
चंद्रपूर विभागातील राजुरा आगाराची बस क्रमांक MH 07 C 9070 ही बस कोरपना तालुक्यातील गाडेगाव विरुर येथे मुक्कामी जात होती बस मध्ये एक महिलेसह चार प्रवासी होते मार्गातील बीबी गावाजवळ रस्तावरून बाजू घेताना पलटी झाली लगेच रस्त्यावरून जाणारे आणि स्थानिक लोकांनी प्रवाश्याना काच फोडून काढण्यात बाहेर काढले . सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. ही बसमध्ये वाहक पिल्लेवाड तर चालक प्रवीण अडकीने होते
पुढील तपास सुरू आहे