
तोहोगाव (प्रतिनिधी)

गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव वासीयांना पावसाळ्यात अतिवृष्टीत इतर गावाशी संपर्क साधता येत नाही. गावात पूरेशी सूविधा उपलब्ध नाही. अश्यातच गावकऱ्यांना अनेक संकटाशी झुंज द्यावी लागते या समस्येची मागणीची तात्काळ दखल घेऊन पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी नवीन पुलासाठी 10 कोटी रुपये मजूर केले
गोंडपीपरी तालुक्यातील तोहोगावला दरवर्षी पावसाळ्यात वर्धा नदीला पूर आला तर गावासभोवती पाणी होऊन नदीचे दोन समांतर प्रवाह सुरू होतो तेव्हा गावाचा इतर गावाशी पूर्णतः संपर्क बंद होते जीव धोक्यात घालून ते दिवस काढावे लागते बऱ्याचदा आरोग्याच्या उपचार होऊ शकला नसल्याने या गँभिर समस्यांमुळे अनेकांचे जीव गेला आहे अनेक जनावरानाही त्याचा फटका बसतो मदतीसाठी प्रशासनासमोर प्रश्न निर्माण होते त्यामुळे तोहोगाव वासीय जनता तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य अमर बोडलावार,योगेश खामनकार,करण गौरकार,अतुल बुक्कावार,प्रकाश उत्तरवार,प्रणित कासनगोत्तुवार,यश उतरवारआदीनी प्रशासन व लोकप्रतिनिधी कडे मागणी केली दरम्यान पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार,,भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे हे तोहोगावला आले असता स्थानिक भाजप पदाधिकाऱयांनी या पुलाची मागणीची गंभीरता समजावून सांगितली असता त्याची तात्काळ दखल घेऊन पूल बांधण्याची हमी दिली होती आणि लगेच बांधकाम विभागास याबाबत सूचना दिले
त्यानंतर अहवालानुसार जुलै 2023 च्या बजेट मध्ये या पुलाचे बांधकामासाठी 10 कोटी रुपये मंजूर केले या पुलामुळे अनेक वरश्याची समस्या मार्गी लागणार असल्याने तोहोगाव वासीय आनंद व्यक्त करीत दिला शब्द म्हणून पूर्ण करणारा नेता म्हणीत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे