मनीपूर राज्यातील महिलांवर झालेला अमानवीय अत्याचार प्रकरणी तालुका काँग्रेस कमिटी तर्फे निषेध आंदोलन

410

*सावली( ता.प्र)*

भारत देशात व राज्यात मोठ्या प्रमाणात महिलांवर अत्याचार होत आहेत. मणिपूर राज्यात जातीय हिंसाचारात अनेक निश्पाप नागरिकांचे बळी गेलेले आहेत. अनेक महिलांचे शोषण करण्यात आलेले आहेत.त्यासोबतच मणिपूर राज्यातील दोन महिलांना निवस्त्र करून ठार मारण्यात आलेले आहे.हि घटना मानव जातीला काळीमा फासणारी आहे.मणिपूर मधिल महिलांवरील अत्याचारामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.या देशात महिला सुरक्षित नाहीत हे यावरुन दिसून येत आहे.

मणिपूर राज्यात सध्या जो हिंसाचार सुरु आहे. त्याकडे केंद्र सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते आहे. गेल्या तिन महिन्यापासून मणिपूर अशांत आहे. त्याकडे गांभीर्याने लक्ष्य देवून परिस्तीती हाताळण्याची आवश्यकता होती मात्र शासन यात पुर्णपणे अपयशी ठरलेली आहे. आणि त्यामुळे सदर गंभीर बाबीकडे आपण जातीने लक्ष्य देण्याची आवश्यकता आहे.

मणिपूर येथील घटनेचा तसेच किरीट सोमय्या प्रकरणाचा आम्ही निषेध करतो भविष्यात महिलांची सुरक्षततेचा प्रश्न सरकारच्या माध्यमातून अधिक चांगल्या पध्दतीने सोडविला जाई अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो.असे प्रतिपादन सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहणे यांनी केले आहे.

या संदर्भातील निवेदन सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे तहसीलदार परीक्षित पाटील यांच्या मार्फत भारताचे महामहीम राष्ट्रपती श्रीमती.द्रोपदी मुर्मु यांना निवेदन पाठविण्यात आले.

निवेदन देताना सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती दिनेश पाटील चिटणुरवार, सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने, महिला तालुकाध्यक्ष सौ.उषाताई भोयर, सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक विजय मुत्यलवार,सावली तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष किशोर कारडे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष अमर कोणपत्तीवार, नगरपंचायत सावलीच्या नगराध्यक्षा सौ.लताताई लाकडे,उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपकार,महिला शहराध्यक्षा सौ.भारती चौधरी,माजी उपसभापती प.स. सौ.मंगला चिमड्यालवार,नं.प.सावलीच्या बांधकाम सभापती सौ.साधना वाढई, पाणीपुरवठा सभापती अंतबोध बोरकर,तसेच आकाश येणप्रेडीवर, सुनील बोमणवार, दीपक जवादे, सुनील पाल,पंकज कागदेलवार, चक्रधर दुधे, डोमा शेंडे, संजय मजोके,श्रीकांत बहिरवार,सौ.अंजली दमके, सौ.शिला गुरुनुले,सौ.प्रीती गोहने, सौ.कविता मुत्यालवार आदी काँग्रेसचे पदाधिकारी, नगर पंचायत सावलीचे नगरसेवक व सर्व फ्रंटल ऑरगॅनिझेशनचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.