
राजुरा,(प्रतिनिधी)-

रविवारी रात्री ९ वाजताच्या दरम्यान स्थानिक आठवडी बाजार वार्डात राहणारे भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे यांच्या घरी गोळीबार झाला, त्यात सचिन डोहे यांची पत्नी पूर्वशा (वय २७) हीचा मृत्यू झाला होता. तर लल्ली नामक हा जखमी झाल्याची घटना घडली यामुळे रात्री शहरात तणाव झाला होता दरम्यान याप्रकरणात सोमनाथपुर वार्डातील लवज्योतसिंग आणि इतर एक विधिसंघर्ष बालकआरोपीस राजुरा पोलिसांनी घटनेच्या तीन तासानंतर अटक केली आहे
आठवडी बाजार वॉर्डात राहणाऱ्या लल्ली नामक व्यक्तीला वैयक्तिक शत्रुत्वातून मारण्यासाठी अज्ञात व्यक्ती शहरात आले होते. ही बाब लल्ली याचा लक्षात येताच तो रात्री भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे ह्यांच्या घरात शिरला. तेव्हा मागावर असलेल्या मारेकऱ्यांनी त्याच्यावर बेछूट गोळीबार सुरू केला. नेमक्या त्याच वेळी पूर्वशा डोहे अंगणात आल्याने पूर्वशा डोहे हिला छातीच्या भागात गोळी लागल्याने त्या जागीच कोसळल्या तर लल्लीच्या पाठीला गोळी लागली, आणि मारेकरी दुचाकीवरून पसार झाले हि वार्ता वाऱ्यासारखी पसरली व शहरात एकच खळबळ उडाली.लगेच दोघांना राजुरातील उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डाक्टरणी पूर्वशा डोहे यांना मृत घोषीत केले तर जखमीस चंद्रपूरला हलविण्यात आले यावेळी दवाखाना समोर लोकांची जमाव वाढल्याने पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आणि काही पोलीस चमू आरोपीचा शोध घेत असताना या गोळीबारात सहभागी असलेला लवज्योतसिंग आणि इतर एक विधिसंघर्ष बालक आरोपीस अटक करण्यात यश आले विशेष म्हणजे यापूर्वी लवज्योतसिंग या आरोपीविरुद्ध बेकायदेशीर शस्त्र बाळगणे बाबत गुन्हा दाखल असल्याचे समजते ,पोलिसांनी आरोपिकडून देशी बनावटीचे पिस्टल ,तीन राउंड जप्त करून भादवीच्या विविध कलमांनव्ये गुन्हा दाखल केला असून पोलीस अधीक्षक,अतिरिक्त पोलीस अधीक्षक सह इतर वरिष्ठ अधिकारी शहरात तळ ठोकून होते
पुढील तपास पोलीस करीत असून अलीकडे राजुरा शहरातील वाढत्या गुन्हेगारीवरून पोलिसांबाबत जनतेत मात्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे
तर या गोळीबारात दुर्दैवाने गोळी लागल्याने पूर्वशा डोहे हीचा निष्पाप बळी गेल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे आज सायंकाळी शोकाकुल वातावरणात पूर्वशा यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आला