सावली तालुक्यातील अनेक मार्ग बंद :हजारों हेक्टर जमीन पाण्याखाली; सावली शहरातील अनेक प्रभाग जलमय

1287

 

गेली तीन ते चार दिवसांपासून सततधार पावसाचा कहर सुरु असून सततच्या पावसाने जनजीवन प्रभावित होत असून तालुका जलमय झाला आहे पावसाचा जोर कायम असल्याने सततधार पावसामुळे तालुक्यात अनेक घरांची पड़झळ झाली असून तालुक्यातील हजारों हेक्टर शेत जमीन पाण्याखाली असल्याने घरादारासह पिकांची मोठी नुकसान झाल्याचे दिसुन येत आहे.

तालुक्यातील अनेक मार्ग बंद झाल्याने वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. आज घडीला पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे तालुक्यात ११९ .५ मिली मि सरासरी इतकी नोद करन्यात आली. त्यामधे सावली सर्कल ९३.२ , व्याहाड सर्कल ६९ .० , पाथरी सर्कल १९६ .४ एकूण ३५८.६ मि मि , प्रोग्रेसिव ६३३.३ मि मि नोद असून यात अनेक गावांचा समावेश आहे.

 

सततच्या पावसामुळे सावली- चारगांव , कापसी – ऊपरी ,जिबगाव – पेटगाव , सायखेड़ा – पालेबारसा , सावली – बोथली , पाथरी – सिन्देवाही , पेंढरी-पाथरी – मुडाळा ,पाथरी – विरखल ,सावली – सिदोळा , अंतरगाव – नीमगांव अशा अनेक गावालगत वाहना ऱ्या लहान – मोठ्या नाल्यातुन पानी दुथळी ओसंबुन वाहत असल्याने वाहतुकीला मोठा अङथळा निर्माण होत आहे.


गोसे चे ३३ दरवाजे खुले केल्याने तालुका लगत वाहनारी वैनगंगा नदी दुथळी वाहत असल्याने नदी लगत असना ऱ्या गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असला तरी नदी लगत असणारी हजारों हेक्टर शेतजमीन पाण्याखाली असून धान पिकासह,कापूस,सोयाबीन व इतरही पिकांचे मोठे नुकसान होत आहे.

सावली शहर पावसाचा पाणी वस्त्यात शिरले;तलावासारखा रूप

सावली शहर व परीसरात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. मागील 4 दिवसांपासून तालुक्याच्या सर्व भागांत मुसळधार पाऊस कोसळत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

शहरातील पदमांवती नगर,पेट्रोल पंप,बालाजी नगरी,मेडिकल चौक,खाती कामटा चौक, यासह अन्य भागात पाणी शिरले आहे. या पावसामुळे रस्त्यांना तलावाचे स्वरूप प्राप्त होऊन गुडघाभर पाणी साचले होते. खोलगट भागातील अनेक घरात पाणी साचल्याने घरांचेसुद्धा मोठे नुकसान झाले आहे.त्यामुळे नपं च्या ढिसाळ कारभारावर सावली कर जनता संतप्त भावना व्यक्त करीत आहे.

पावसामुळे मोठ्या प्रमाणात घरांची पळझळ झाल्याची तक्रारी प्रशासनाकडे येत आहे.पावसाने उसंत घेतल्यावर सावली नगराध्यक्ष लता लाकडे यांनी सावली शहरात काही भागात भेट देऊन पाहणी केली.