
चंद्रपूर- गडचिरोली जिल्ह्याच्या सीमा असलेले वैनगंगा नदीचा व्याहाळबुज जवळील पुलावरील आज अंदाजे रात्रौ नऊच्या सुमारास एका युवकाने आपली गाडी बाजूला ठेवून चक्क vainganga वैनगंगेचा पात्रातच उडी मारल्याची खळबळजनक घटना घडलेली आहे.

आज दिनांक 20 ला रात्रो अंदाजे नऊ तास सुमारास एम एच 33 एच ६७८१ ही डिस्कवर लाल काळ्या कलरची गाडी घेऊन एक युवक हा नदीपात्राचा पुलावरील मध्यभागी थांबला. गाडी बाजूला ठेवून चक्क नदीच्या पात्रता त्यांनी उडी मारल्याची घटना घडलेली आहे. सदर उडी मारत असल्याचे अनेकांनी पाहिलेत असल्याचे बोलले जात आहे.
सदर वैनगंगा नदी ही पूर्णपणे दुधडी भरून वाहत आहे.याच वेळी या युवकांनी उडी मारली सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आलेली आहे. तर उडी मारणारा युवक कोण? याबाबतचा शोध कार्य सुरू आहे.