पोंभुरणा वनपरिक्षेत्रात वाघाचा आकस्मिक मृत्यू ?

1014
  • राजुरा(संतोष कुंदोजवार)-
    मध्य चांदा वनविभाग अंतर्गत येणाऱ्या पोंभूर्णा वनपरिक्षेत्रात वाघाचा बछळा चा आकस्मित मृत्यू झाल्याचे आढळून आले.
    दिनांक २० जुलै रोजी सकाळी मुल तालुक्यातील बेंबाळ येथील स्थानिक लोकांकडून वाघ गावा जवळ असल्याचे दिसून आले अशी बातमी मिळाली असता स्थानिक वन कर्मचारी यांनी जागमोक्यावर पाहणी केली असता सकाळी वाघाचा वावर दिसून आला. वाघ जखमी असल्याचे दिसून आले नंतर चंद्रपूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांना पाचारण करून वाघाची पाहणी केली असता दुपारी ४ वाजता सदर चा वाघ मृत्यू पावल्याचे निष्पन्न झाले.
    सदरची घटना ही कक्ष क्रमांक ५४३, नियतक्षेत्र पिपरी दीक्षित, पोंभुर्णा वनपरिक्षत्रात घडली.हा वाघाचा बछळा मादी असून अंदाजे दीड वर्षांचा असावा असे वणाधिकार्यानी सांगितले
    वाघाच्या मृत्यूचे कारण शव विच्छेदन अहवाल नंतर च सांगता येईल त्यासाठी मृत वाघाला चंद्रपूर व्याघ्र उपचार केंद्रात नेण्यात आले असून तिथे शवविच्छेदन करण्यात येईल त्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे सहायक वनसंरक्षक श्रीकांत पवार यांनी सांगितले
    घटनेचा पुढील तपास उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू यांचे मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक श्रीकांत पवार,वनपरिक्षेत्र अधिकारी फनिंद्र गादेवार,क्षेत्रसाहायक बोधे ,वनरक्षक करीत आहे