
सावली तालुका माळी समाज संघटना जिल्हा चंद्रपूर यांच्या वतीने आज दिनांक 9 जुलै, 2023 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती सावली येथील सभागृहात सावली तालुक्यातील माळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.
यावेळी विचार मंचावर उपस्थित डॉ. अभिलाषा गावतुरे मॅडम, सामाजिक कार्यकर्त्या चंद्रपूर यांनी आजचे विद्यार्थी हे उद्याच्या उज्वल भारताचे भविष्य आहेत, असे प्रतिपादन केले. तसेच प्रा.नामदेव जेगंटे सर, ओबीसी विचारवंत ब्रम्हपुरी यांनी संघटना व संघटनेचे महत्त्व याबाबत तसेच मा.अभिजित मोहुर्ले सर, संचालक व मार्गदर्शक, एम्स स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र,गडचिरोली यांनी स्पर्धा परीक्षेविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी विचार मंचावर मा.सोमनाथ वाढई सर, सावली तालुका माळी समाज संघटनेचे अध्यक्ष अतुल लेनगुरे, नगरसेविका साधनाताई वाढई इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तसेच सदर कार्यक्रमास मा.प्रल्हाद कावळे सर, प्रा. सुरेश लोणबले सर चंद्रपूर, लक्ष्मण चौधरी सर हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. तसेच सावली तालुका माळी समाज संघटनेचे सर्व पदाधिकारी व तालुक्यातील विविध गावातील समाज बांधव व विध्यार्थी- विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते.
सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. व त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन झाले व सावली तालुक्यातील दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा व स्कॉलरशिप परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे यशस्वीते करिता सावली तालुका माळी समाज संघटनेचे अध्यक्ष अतुल लेनगुरे, उपाध्यक्ष सुरेश ढोले, रोशन गुरनुले, सचिव प्रवीण ढोले, संघटनेचे मार्गदर्शक दिनकर मोहुर्ले, कोषाध्यक्ष मनोज चौधरी, सदस्य सुनील ढोले, भोगेश्वर मोहुर्ले,राजु सोनुले व इतर संघटनेच्या सर्व पदाधिकारी तसेच समाज बांधव यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशन गुरनुले व आभार प्रदर्शन सौ.शिलाताई गुरनुले यांनी केले.
