
राजुरा(संतोष कुंदोजवार)-
मानव विकास मिशन अंतर्गत राजुरा तालुक्यातील आर्वी आणि पाचगाव येथे आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात गरोदरमाता,स्तनदा माता,आणि लहान बालकाची आरोग्य तपासणी केली जाते त्यामुळे आज आर्वी उपकेंद्रात सात खेडे गावातील सुमारे 45 रुग्णतसेच पाचगाव उपकेंद्रात सात गावातील 50 रुग्ण याशिबिरात नोंदणी केली होती सकाळी दहा वाजता शिबीर सुरू होणार असल्याने काही रुग्णांना शासकीय वाहनांनी आणण्यात आले
परंतु दुपारचे तीन वाजण्याची वेळ होईपर्यत शिबिरासाठी नेमण्यात आले तज्ञ डाक्टर आले नसल्याने रुग्णांना तातकडत राहावे लागले
याबद्दल काही रुग्णानी पत्रकारांना याची माहिती दिली तेव्हा पत्रकारांनी आर्वी येथे भेट दिली असता रुग्ण चागलेच वैतागले होते त्यांनी आपबीती सांगितली
इतक्यात समभडीत स्त्रीरोग तज्ञ बोरकर,आणि बालरोगतज्ज्ञ डाक्टर खिचडे शिबीरात पोहचले त्यांना उशिरा येण्याबद्दल विचारले असता उडवाउडवीची उत्तरे दिली
आर्वी येथील शिबिरात हे डाक्टर तीन वाजता येऊन रुग्ण तपासणी करणार तर पाचगाव येथील रुगणाची तपासणी किती वाजता करणार असा संतप्त विचारणा शिबिरातील रुग्णाणी केली आहे

बाबमानव विकास शिबीराचे माध्यमातून ग्रामीण आरोग्य सुदृढ करण्यासाठी हा विशेष उपक्रम राबविले जाते एक आरोग्य शिबिरासाठी विशेष निधी सुद्धा दिला जातो शिबिरात येणाऱ्या विशेष तज्ञ डाक्टर यांनाही पुरेसा मानधन दिले जाते असे असतानाही एकाच दिवशी दोन आरोग्य शिबिर घेऊन तसेच तज्ञ डाक्टर उशिराने येऊन रुगणाच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे आतापर्यत झालेल्या आरोग्य शिबिराची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे