वर्धा नदीत तोहोगाव येथील तीन बालके बुडाले

2663

#शोध मोहीम सुरू#
राजुरा (प्रतिनिधी)-
गावालगत असलेल्या वर्धा नदीत खेकडे पकडण्यासाठी गेलेले तीन बालके बुडाल्याची घटना गोंडपीपरी तालुक्यातील तोहोगाव येथे घडली असून त्यातील एक जण वाचल्याने घटना उजेडात आली, माहिती मिळताच पालक,गावकरी,पोलीस घटनास्थळी जाऊन बुडालेल्याचा शोध घेत आहे
आज दुपारी तोहोगाव येथील प्रतीक नेताजी जुंनघरे ,निर्दोष ईश्वर रंगारी,सोनल सुरेश रायपुरे, आरुष प्रकाश चांदेकर सर्व अंदाजे 12 वर्ष वयाची बालके मिळून वर्धा नदीत खेकडे पकडण्यासाठी गेले पाण्याचा अंदाज न आल्याने यातील प्रतीक जुंनघरे,निर्दोष रंगारी,सोनल रायपुरे हे खोल पाण्याच्या प्रवाहात बुडाले तर आरुष चांदेकर कसाबसा वाचला आणि गावात येऊन पालकांना घडलेली घटना सांगितली
माहिती मिळताच पालक,गावकरी घटनास्थळी पोहचून शोध घेत आहे दरम्यान कोठारी,लाठी आणि विरुर पोलीस ठाण्याचे पोलीसही घटनास्थळी पोहचून शोध मोहीम सुरू केली आहे
वृत्त लिहिपर्यंत शोध लागला नाही या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे