शेळ्यांच्या कळपावर बिबट्याचा हल्ला;शेळी ठार; मेंढपाळ जखमी

956

#bothli #forest #saoli #maharashtra #chandrapur

सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या बोथली येथे नदीच्या काठावर शेळ्यांचा कळप हा मुक्कामी ठेवला असता त्यावर रात्री 2च्या सुमारास बिबट्यांनी हल्ला केला.

 

शेळीवर हल्ला करीत असल्याचे दिसत असतांनाच त्यात ठिकाणी असलेला मेंढपाळ भीमा कन्नावार रा. बेंबाळ (वय 60 वर्ष) याच्यावर हल्ला करून जखमी केले व एका शेळी ला ठार केले. सदर व्यक्ती बेंबाळ चा असून तो इथे सध्या बोथली इथे राहत होता.त्या जखमी ला बोथली येथे आणण्यात आले त्यानंतर गडचिरोली येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार साठी भरती करणयात आले आहे.

सद्या वाघ व बिबट चा संचार हा मोठ्या प्रमाणात होत आहे मात्र सुरक्षेसंदर्भात वनविभाग सावली च्या वतीने कोणतेही पाउले उचलत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.