
💥आत्ताची ब्रेकिंग न्यूज

व्याहाड जवळ दोन दुचाकींची सामोरा समोर धडक; 3 जण जागीच ठार;3गंभीर जखमी
चंद्रपूर-गडचिरोली मुख्य मार्गावरील व्याहाड खुर्द येथील रोहनकार पेट्रोल पंप समोरील काही अंतरावर दोन दुचाकी स्वारांची एकमेकांना जोरदार धडक दिल्याने 3 जण जागीच ठार झालेले असून त्यात 3 जण गंभीर जखमी झाले आहे.
हरीश पांडुरंग सहारे वय 35 रा. नांदगाव तालुका सिदेवाही,सागर रघुनाथ शेडमाके वय 22,राहणार हिरापुर,प्रशांत आत्राम वय 30 वर्ष रा.हिरापूर तालुका सावली मृत्यू पावले तर जखमींमध्ये अजय विजय गोरडवार वय 32 वर्षे रां सावली व सुमित शेडमाके हिरापूर व प्रशांत चावरे नांदगाव गंभीर जखमी आहे.
जखमी यांना गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आलेले असून दोन्ही दुचाकी वर तीन तीन जण बसलेले होते अशी माहिती मिळते आहे.घटनेची माहिती सावली पोलीसांना देण्यात आली पोलीस घटनास्थळी पोहचले आहे व जखमींना रुग्णालयात पोहचविले आहे.जखमी वर उपचार सुरू असू गंभीर आहे.