व्याहाड जवळ दोन दुचाकींची सामोरा समोर धडक; 2 जण जागीच ठार;4 गंभीर जखमी

3696

#breking #accident #gadchiroli-vyahad #saoli #saolipolice

चंद्रपूर-गडचिरोली मुख्य मार्गावरील व्याहाड खुर्द येथील रोहनकार पेट्रोल पंप समोरील काही अंतरावर दोन दुचाकी स्वारांची एकमेकांना जोरदार धडक दिल्याने 2 जण जागीच ठार झालेले असून त्यात 4 जण गंभीर जखमी झाले आहे.

 

जखमी यांना गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आलेले असून दोन्ही दुचाकी वर तीन तीन जण बसलेले होते अशी माहिती मिळते आहे.यातील 2 जण हिरापूर येथील शेडमाके असून वृत्त लिहेपर्यंत मृतक व जखमी यांचे नावे कळालेली नाही.घटनेची माहिती सावली पोलीसांना देण्यात आली पोलीस घटनास्थळी पोहचले आहे