
सावली शहरात येणाऱ्या मुख्य मार्गावर छत्तीसगड वरून आंध्रा कडे जाणाऱ्या ट्रक CG 04 LY 7668 या क्रमांकाचा ट्रक हा छत्तीसगड वरून आंध्र प्रदेश कडे जात असतानाच आज मध्यरात्रीच्या सुमारास सदर ट्रक हा सावली शहरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय समोरील डीवायडर वर चढून एक मोठा खांब उकडून समोर जाण्याचा प्रयत्नात अपघात झालेला आहे.सुदैवाने ट्रक हा पलटी मारला नाही तसेच यात जीवित हानी झाली नाही. सदर अपघाताची माहिती सावली पोलिसांना मिळतात त्यांनी घटनास्थळी येत पाहणी केली असता चालक पसार झाल्याची माहिती मिळते आहे. सदर चालकाविरुद्ध कारवाई होण्याची शक्यता असून राष्ट्रीय महामार्ग बांधकाम कंत्राटदाराचे नुकसान केले आहे.या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
