नोकर भरती परिक्षांचे भरमसाठ वाढविलेले शुल्क कमी करा #आमदार सुभाष धोटेंची मागणी.#

65

 

राजुरा (संतोष कुंदोजवार) :-राज्य शासनाकडून होऊ घातलेल्या नोकर भरती प्रक्रियेचे शुल्क कमी करून विद्यार्थ्याना दिलासा देण्याची मागणी राजुराचे आमदार सुभाष धोटे यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे

राज्य शासनाकडून तृतीय आणि    चतुर्थ श्रेणी कर्मचारी च्या वन विभागातील वनरक्षक, स्टेनो, लेखापाल, महसूल विभागातील तलाठी, गृह विभागातील राज्य उत्पादन शुल्क खात्यांतर्गत जवान पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेबद्दल स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या बेरोजगार युवक युवतींमध्ये फ़ार्म भरण्याची उत्सुकता दीसत आहे. परंतू फ़ार्म भरण्या साठी लगणारा खर्च अत्यल्प असतांना, भरती प्रक्रिया शुल्कात मोटी वाढ करुन आर्थिक लुट सुरु आहे, त्यामुळे परीक्षा स्पर्धक
विवंचनेत असल्याचे दिसून येत आहे.
या तिन्ही भरती प्रक्रिया टी. सी. एस. या खासगी कंपनीला कंत्राट देण्यात आले, ऑनलाईन पध्दतीने ही परिक्षा घेण्यात येणार आहे. अमागास प्रवर्गासाठी रुपये 1000/- आणि मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, प्रवर्गासाठी रुपये 900/- एवढे परिक्षा शुल्क ठेवण्यात आले आहे. सदरची परिक्षा शुल्क रक्कम ही मोठी असून विद्यार्थ्यांना एवढे शुल्क भरणे कठीण आहे. आधीच बेरोजगार त्यातही हालाकी च्या परिस्थितीत, अहोरात्र अभ्यास करुन हे विद्यार्थी परिक्षेला सामोरे जात आहे. मात्र भरमसाठ ठेवलेल्या शुल्कामुळे विद्यार्थ्यांना परिक्षेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. असे असतांना राज्य शासनानी सदरहु शुल्क कमी करण्याबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे. तरी राज्य शासनानी होऊ घातलेल्या नोकर भरती प्रक्रिया शुल्क कमी करण्यासाठी तातडीने निर्णय घेवून राज्यातील बेरोजगार विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.