
राजुरा(संतोष कुंदोजवार)-
मानव आणि वन्यजीव यातील संघर्ष टाळण्यासाठी जनतेला वनकायदा तसेच वन्यप्राणी आणि अन्नसाखळी याबाबत माहिती देण्यासाठी चीचपल्ली वनपरिक्षेत्रातील नागाळा, गोंडसावरी,महादवाडी आदी गावात पथनाट्यद्वारे जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत आहे
चंद्रपूर वन विभाग चे विभागीय वन अधिकारी यांचे आदेशानव्ये चीचपल्ली वन परिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे याचे मार्गदर्शनात सुभेदार रामजी बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर चे कलाकार लोकभाषेतून पथनाट्यद्वारे जनजागृती करीत आहेत कार्यक्रमास स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी,समिती सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने याचा लाभ घेत आहे कार्यक्रमासाठी क्षेत्रसहायक प्रशांत खनके,वनरक्षक विनोद उईके,वनरक्षक गणेश दिवटे,वनरक्षक हेमंत मोहूर्ले, आणि वनमजुर परिश्रम घेत आहेत
