सिंदेवाही- पाथरी रोडवर स्कार्पिओ ला आग

3000

 

#theberningCard #सिंदेवाही
सिंदेवाही वरून सावली कडे येणाऱ्या एका स्कार्पिओ ला आज दुपारी तीनच्या सुमारास चिकमारा ते मेंढा या रस्त्याच्या मधातच एका स्कार्पिओ वाहनाला अचानक आग लागल्याने त्यात वाहनातील तीन जण एका दरवाजातून सुखरूप बाहेर पडले मात्र स्कार्पिओ वाहनाने आगीचा चांगलाच भडका घेतल्याने गाडी संपूर्ण जळत आहे. सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून सदर वाहन हे सावली तालुक्यातील कोंडेखल येथील असल्याचे कळते. या वाहनाला आग लागल्याने या रस्त्यावरची वाहतूक काही काळासाठी ठप्प झालेली होती. मात्र आगीच्या रुद्ररूप पाहून अनेकांमध्ये भीतीचे वातावरण सुद्धा पसरलेले होते.