केशरवाही गावात बिबट घुसला;शेळी ला केले ठार

813

 

सावली तालुक्यातील केशरवाही येथे सध्या बिबट ची दहशत असून बिबट हा गावात घुसून शेळी ठार केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

दिनांक ११/०६/२०२३ रोज़ी यशवंत पा शेंडे याचे घरी रात्रि ठीक १०:५८ वाजता घरात खूंटी ला बांधुन असलेल्या बकर्यावर बिबट्याने हल्ला करून तिला जागीच ठार केला आहे.

केशरवाही या गावाच्या परिसरात बिबट चा वावर आहे अशी माहीती सावली वनपाल व वनरक्षक यांना देण्यात आली मात्र ते या घटनेकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत आहे.
केशरवाही गावात ही चौथी घटना घडलेली आहे.आणि संपूर्ण गावातील नागरिक या बिबट्याने शेतकरी त्रस्त झालेले आहे. तरी या बिबट्याच लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.