भूमी अभिलेख कार्यालयाच्या विरोधात 27 जून पासून मेडपल्लीवार यांचे आमरण उपोषण

1336

 

भूमिअभिलेख कार्यालयाचा भोंगळ कारभार उधळ 

सावली येथील भूमापन क्रमांक 229 या गटाच्या सातबारा अभिलेखावरील मधुकर केशव मेडपलिवार यांचा नावाचे आराजीची नोंद घेण्याकरिता दिनांक 29/7/ 2019 ला अर्ज सादर करण्यात आलेला होता मात्र चार वर्षाच्या कालावधी लोटूनही उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या जाणीव पूर्वक दुर्लक्षित पणा मुळे न्याय मिळाले नाही त्यामुळे न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून आमरण उपोषण करत असल्याच्या इशारा यावेळी संदीप मेडपलीवार यांनी दिलेला आहे.

 

सावली येथील भूमापन क्रमांक २१९ या गटाचा सातबारा वर मधुकर केशव मेडपल्लीवार यांचे नोंद होते त्यानंतर सदर असलेले नोंद ही वगळण्यात आले त्यामुळे ती नोंद घेऊन न्याय देण्या करिता दिनांक 29 /7 /2019 ला या उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय सावली ला अर्ज सादर करण्यात आले. मात्र तेव्हापासून संबंधित अधिकारी व कर्मचारी याकडे दुर्लक्ष केले. संबंधित अर्जदार संधी मेडपल्लीवार हे प्रत्येक महिन्याला संबंधित कार्यालयामध्ये जाऊन आम्ही दिलेल्या अर्जाचा काय झालं? या संदर्भात विचारणा केली मात्र त्यांना अद्यापही थातुरमातुर उत्तरे देऊन वेळ मारत असल्याचा प्रकार दिसत आहे.

 

त्यामुळे चार वर्षापासून त्यांना अनेक शासनाच्या योजनेपासून वंचित राहावे लागलेले आहे त्यांना त्यांच्या शेतात पिकांची पिके सुद्धा बुडलेली होती मात्र त्याच्या सुद्धा लाभ त्यांना मिळालेला नाही.आमची जागा आमच्या नावे चढवून देण्यास दिरंगाई करीत आहे. त्यामुळे दिनांक 27/6 /2023 पर्यंत आम्हाला आमच्या नावाची जागा नावे न केल्यास आम्ही आपल्या परिवारासह कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार अशा पद्धतीचे पत्र त्यांनी उपाधीक्षक कार्याला दिलेले आहे.यावेळी संदीप मेडपल्लीवार त्यांची पत्नी हर्षला मेडपल्लीवार व आई विमल मेडपल्लिवार हे उपस्थित होते.