दादाजी किनेकर यांचा उपसरपंच पदाचा राजीनामा

1464

 

सावली तालुक्यातील साखरी शिरशी ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाचा दादाजी किंहेकार यांनी राजीनामा दिलेला आहे. सदर राजीनामा गट विकास अधिकारी पंचायत समिती सावली यांच्याकडे सोपविलेला आहे.

सावली तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रमाणेच साखरी ग्रामपंचायतचे निवडणूक पार पडलेली होती. या निवडणुकीत भाजपा समर्पित पाच व काँग्रेस समर्थित चार सदस्य निवडून आलेले होते. सरपंच पद हे अनुसूचित जमाती राखीव होते त्यामुळे या पदावर ईश्वरदास गेडाम हे सरपंच म्हणून तर उपसरपंच म्हणून दादाजी किनेकर यांची निवड करण्यात आली होती.निवड करत असतानाच सर्व सदस्यांना सोबत घेऊन अडीच-अडीच वर्षाचा कालावधी करण्याचे ठरवण्यात सुद्धा आलेले होते.

 

गेल्या एक महिन्यापूर्वीच सरपंच ईश्वरदास गेडाम यांचे निधन झाले त्यामुळे उपसरपंच दादाजी किनेकर यांच्याकडे प्रभारी सरपंच पदाची धुरा आली मात्र शिरशी व साखरी गावाचा विकास कार्यासंदर्भात ग्रामपंचायत सदस्यांच्या पाहिजे त्या पद्धतीत सहकार्य मिळत नसल्याचे प्रभारी सरपंच दादाजी किनेकर यांच्या लक्षात आले. ठरल्याप्रमाणे अडीच वर्षाच्या कालावधी हा ऑगस्ट महिन्यात संपत असताना सुद्धा आज दिनांक 9/6/2023 ला दादाजी किनेकार यांनी आपल्या प्रभारी सरपंच, उपसरपंच पदाचा राजीनामा संवर्ग विकास अधिकारी सावली यांच्याकडे सोपवलेला आहे. त्यामुळे त्या परिसरातील राजकारणात एकच खळबळ माजलेली आहे.