
व्याहाड खुर्द येथे तक्रार निवारण सभेचे आयोजन

सावली(सूरज बोम्मावार) गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना भेडसवणाऱ्या विविध समस्यांचा निपटारा करण्यासाठी अधिकारी वर्गानी स्वतः लक्ष घालावे व शेतीच्या हंगामात प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पाणी योग्य पोहचला पाहिजे याची काळजी घ्यावी अन्यथा मला त्याचे परिणाम वाईट होईल असे आमदार विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आज विशेष तक्रार निवारण सभा तालुक्यातील व्याहाड खुर्द, येथे सावली तालुका काँग्रेस कमिटी तर्फेआयोजन केलेले होते त्यावेळी बोलत होते.
या तक्रार निवारण सभेत पाणी उपलब्धतेबाबतच्या सर्व समस्या निकाली लावणे,प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला मिळणेबाबत तसेंच शेतकऱ्यांकडून सभेप्रसंगी विषयान्वये वेळेवर येणाऱ्या सुचना व तक्रारी हे प्रमुख विषय ठेवण्यात आले होते
या तक्रार निवारण सभेला प्रमुख पाहुणे म्हणून माजी बांधकाम सभापती दिनेश पाटील चिटणुरवार, सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हिवराज पाटील शेरकी, उपसभापती दिवाकर भांडेकर, माजी प.स.सभापती विजय कोरेवार,व्याहाड खुर्दच्या सरपंच सौ.सुनीताताई उरकुडे,उपसरपंच भावनाताई बीके,सेवा सोसायटी अध्यक्ष दीपक जवादे ,युवा नेते संचालक कृषी बाजार समिती सावली निखिल सुरमवार,माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य केशव भरडकर,युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष किशोर कारडे,माजी तालुकाध्यक्ष युवक काँग्रेस आशिष मंबतुलवार,काँग्रेस कार्यकर्ता अनिल पाटील मशाखेतरी व सुनिल बोमणवार तसेच आयोजित सभेस गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांचा समस्या तातडीने निकाली काढण्याकरिता गोसेखुर्द प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अभियंता राजेश सोनवणे,अभियंता जितेंद्र तुरखळे,अभियंता संदीप हासे तसेच पोलीस विभागातर्फे सावलीचे ठाणेदार मा.आशिष बोरकर व संबंधित विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
तालुक्यातील शेतकऱ्यांचा समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना मा.आमदार.विजय वडेट्टीवार यांनी सूचना दिल्या.
तसेच यावेळी वडेट्टीवार म्हणाले की, सावली तालुक्यातील जनतेला गोसेखुर्द प्रकल्प आल्याने हजारो हेक्टर जमिनीला त्याचा फायदा झाला.मी राज्यमंत्री असताना मा.सोनियाजी गांधी व पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे गोसेखुर्द प्रकल्पचा मुद्दा मांडला,गोसेखुर्द हा राज्यस्तरीय प्रकल्प बहुऊदेशिय महत्वाचे असल्याने त्याला राष्ट्रीय प्रकल्प घोषित करून अवघ्या दीड- दोन महिन्यात या प्रकल्पाला ५००० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला.
शेतकऱ्यांवर आत्महतेची वेळ येऊ नये,त्यांचा जमिनी सुजलाम सुफलाम व्हाव्यात. त्यासाठी शेतकऱ्यांना शेती पाणी भेटणे आवश्यक आहे, अंडर ग्राऊंड प्रणालीद्वारे तालुक्यातील ७५% शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्याचे काम चालू असून उर्वरित २५% काम पूर्णत्वास येत आहे.चंद्रपूर जिल्ह्याला आणखी ५०० कोटी रुपयांची आवश्यकता असून आपल्या भागात २५% लोकांना दुबार पेरणीसाठी पाणी पुरवले जाणार त्यासाठी मी प्रयत्नशील आहे.शेतकऱ्यांनी समंजस्याची भूमिका घेऊन एकमेकाला सहाय्य केले पाहिजे.शेतकऱ्यांनी २ वर्षात धान नाही पिकवले तरी देशात उपलब्ध भरपूर साठा आहे.नव-नवीन पिके घेण्याचे धाडस शेतकऱ्यांनी करावे, शेतपूरक दुग्ध व्यवसायला चालना देली पाहिजे, आपल्या भागात लवकरच नवीन प्रकल्प होणार आहेत त्यांचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिल गुरुनुले तर आभार जनसंपर्क कार्यालय प्रमुख कमलेश गेडाम यांनी मानले