
#breking #saoli #crime #vyahadkd

सावली तालुक्यातील कांग्रेस चे युवा नेते,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निखिल सुरमवार यांच्या व्याहाड खुर्द येथील निवास स्थाना समोर उभी असलेली महेंद्र थार कंपनी ची MH34 CD 8877 ह्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला चढवीत विटांनी त्यांच्या गाडीचे समोरील तसेच चालक च्या बाजूला असलेले दोन्ही काच फोडण्यात आले तसेच गाडीवर दगड फेक केली असल्याचे सकाळी उठल्यानंतर दिसून आले.
सदर घटनेची माहीती निखिल सुरमवार यांनी सकाळी सावली पोलिसांना दिलेली असून पोलीस घटनास्थळी येऊन पाहून त्या संदर्भात तपास करीत आहे.ही घटना मध्यरात्री च्या सुमारास घडली असावी अशी शंका व्यक्त केल्या जात आहे.