
गोंडपीपरी(संतोष कुंदोजवार)-
वेगळा विदर्भ हा काळाची गरज असून,बेरीजगार,तथा सर्वसामान्य जनतेसोबत क्षेत्राचा विकास कसा होऊ शकतो यासाठी जनतेत जनजागृती करून वेगळा विदर्भ मिळविण्यासाठो गावागावात जनजागृती कार्यक्रम घेण्यात येणार असून यासाठी यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा स्वतंत्र भारत पक्षांनी निर्धार केला असल्याची माहिती मदन खामनकर यांनी दिली
वेगळा विदर्भ हा विषय अनेक वरश्यापासून प्रलंबित आहे वेळोवेळी स्वतंत्र भारत पक्ष वेगळा विदर्भ साठी आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधून घेत आहे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आमचे सरकार आल्यास वेगळा विदर्भ करू असे आश्वासनही दिले परंतु सध्या राज्य आणि केंद्रात भाजप प्रणित सरकार असूनही वेगळा विदर्भ आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे परिणामी ज्या प्रमाणात विदर्भाचा विकास,बेरोजगारांची समस्या,औदयोगिक विकास,सिंचन विकास,शेती विकास यावर होत आहे,,उच्च पदस्थ अधिकारी सुद्धा,पश्चिम महाराष्ट्रातील असल्याने स्थानिक हुशार लायकी असूनही त्या पदापासून वंचित राहावे लागत आहे या व अश्या अनेक समस्यांनी विदर्भ सुजलाम सुफलाम असूनही अन्यायग्रस्त,अति मागास आहे यास काही राजकीय अनास्था सुद्धा कारणीभूत आहे
अश्या विविध विषय घेऊन जनतेत जनजागृती करून वेगळा विदर्भात बाबत तीव्र आंदोलन करण्याच्या अनुषंगाने नुकतेच तोहोगाव येथे स्वतंत्र भारत पक्षाचे प्राताध्यक्ष तथा माजी आमदार अडव्होकेट वामनराव चटप यांचे नेतृत्वात विशेष पदाधिकारी,कार्यकर्ता बैठक घेण्यात येऊन त्याबाबत ठराव घेण्यात आला आणि यातून पदाधीकारी ,कार्यकर्ते नवीन ऊर्जा घेऊन जनजागृती मोहीम द्वारे तीव्र आंदोलन राबविणार असल्याची माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे तालुका उपाध्यक्ष मदन खामनकर यांनी पत्रकार परिषदेत दिली
