
सावली (ता.प्र)
सावली तालुका युवक काँग्रेस व सावली शहर युवक काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने काल सावली तालुक्यातील दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थी, जेष्ठ नागरिक व नवनियुक्त सावली तालुका काँग्रेस व सावली शहर युवक काँग्रेस अध्यक्ष व पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ व कार्यकर्ता मेळावा विश्व शांती विद्यालय येथे आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे उदघाटक राज्याचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार विजयभाऊ वडेट्टीवार, कार्यक्रमाचे सहउदघाटक, माजी नगराध्यक्ष गडचिरोली अँड.रामभाऊ मेश्राम, अध्यक्षस्थानी माजी बांधकाम सभापती जि.प. दिनेश पाटील चिटणुरवार तर प्रमुख उपस्थिती म्हणून युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानीताई वडेट्टीवार,युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती दिवाकर भांडेकर, माजी सभापती प.स.सावली विजय कोरेवार, सावली तालुका काँग्रेस कमीटीचे अध्यक्ष नितीनजी गोहणे, तालुकाध्यक्षा सौ.उषाताई भोयर, सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक विजय मुत्यलवार, तसेच शहराध्यक्षा सौ.भारती चौधरी, नगर पंचायत सावलीच्या नगराध्यक्षा सौ.लताताई लाकडे, उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपकार, सरपंच संघटनेचे अध्यक्ष पुरषोत्तम चुदरी, उपाध्यक्ष ब्रम्हपुरी विधानसभा युवक काँग्रेस नितीन दुवावार, नवनियुक्त युवक तालुकाध्यक्ष किशोर कारडे व शहराध्यक्ष अमरदीप कोनपत्तीवार उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्रातील एकमेव खासदार स्व.बाळूभाऊ धानोरकर यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांना मा.आमदार विजयभाऊ वडेट्टीवार व सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे श्रद्धांजली वाहून विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच सावली शहरातील ६५ वर्षावरील जेष्ठ कार्यकर्त्यांचा शाल व श्रीफळ देऊन आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
देशातील सद्य स्तिथितील परिस्थितीवर चिंता व्यक्त करताना राज्याचे माजी मंत्री व आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी सत्तांतराचि गरज असल्याचे सांगितले,देशातील स्त्रियांचे महत्व कमी केल्या जात आहे. वाढती बेरोजगारी, महागाई याचे परिणाम गंभीर आहेत, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना ते म्हणाले की डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो हे प्राशान करेल तो गुरगुर्ल्याशिवाय राहणार नाही, विद्यार्थ्यांनी खूप नामवंत व्हावे आई वडील व गुरूंचे नाव उंचवावे व त्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.