
” क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ” यांच्या बद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ” इंडक्ट टेल्स ” आणि ” हिंदू पोस्ट ” वेबसाईटवर बंदी आणून लेखकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याबाबतचे निवेदन सावली पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांना देण्यात आले.

सविस्तर वृत्त असे की , ” इंडिक्ट टेल्स ” आणि ” हिंदू पोस्ट ” नामक मनुवादी वृत्ती असलेल्या भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक , आद्य समाज सुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन लिखाण करण्यात आलेले आहे . शरयू ट्रस्ट नावाची संस्था इंडक्ट टेल्स ही वेबसाईट चालवते . यात सावित्रीबाई फुले यांची शाळा म्हणजे ब्रिटिश सैनिकांना मुली पुरवण्याची सोय , अशी मांडणी या वेबसाईटवरील लेखांमध्ये करण्यात आलेली आहे . सावित्रीबाई फुलेंच्या कामाबद्दल ” इंडीक टेल्स ” च्या लेखात अतिशय अपमान जनक भाषेचा वापर करण्यात आलेला आहे . हे अत्यंत वेदनादाही आहे . शिव – फुले – शाहू – आंबेडकरांच्या महाराष्ट्रात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ची बदनामी करण्याचा हा प्रकार अतिशय संताप जनक आणि घाणेरडा असून त्याचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षण मिळावे म्हणून आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं . महिलांना शिक्षण देत असताना विसाव्या शतकातील तत्कालीन मनुवादी वृत्तीच्या लोकांकडून दगड धोंडे , शेणाचे प्रहार सुद्धा आपल्या अंगावर झेलले . समाजातील विषमता दूर करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची केले . या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल आजही समाजातील दुष्ट प्रवृत्ती कडून प्रहार केल्या जात आहे . एकविसाव्या शतकात सुद्धा मनुवादी शक्ती पुन्हा एकदा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंवर चिखल फेक करीत आहेत . या पोर्टलवर इतिहासाची पुनर मांडणी या नावावर अक्षरशा इतिहासाची मोडतोड सुरू आहे . ही समाजविघातक प्रवृत्ती ठेचण्याची आवश्यकता आहे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बदनामी बाबतचा विषय शासनाने गांभीर्याने घेऊन आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ” इंडिक टेल्स ” आणि ” हिंदू पोस्ट ” वेबसाईटवर बंदी आणून सदर अवमानकारक लेख लिहिणारी वेबसाईट आणि लेखकावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सावली येथील अनिल गुरनुले , सावली तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमरदीप कोनपत्तिवार , नगरपंचायत सभापती नितेश रस्से , सभापती प्रीतम गेडाम , नगरपंचायत चे माजी उपनगराध्यक्ष भोगेश्वर मोहुर्ले , सरपंच सुनील पाल , मनोज चौधरी , किशोर घोटेकर , श्रीधर सोनुले , दिनकर वाघाडे , सुनील ढोले , कमलेश गेडाम , प्रशांत राइंचवार यांनी ठाणेदार सावली यांना निवेदन देऊन मागणी केलेली आहे .