शिक्षक भरती न झाल्यास बेमुदत आंदोलन

244

 

महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत ठराव.

 

राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी रिक्त असलेले शिक्षक पदे शासनाने ३१ जुलै पूर्वी १००% भरावीत अन्यथा या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी संघटनेच्या वतीने आझाद मैदानावर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा ठराव नुकत्याच कोल्हापूर झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत करण्यात आला.
राज्यनेते विजय भोगेकर (चंद्रपूर) यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकिच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील होते.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत ३० ते ३५ हजार शिक्षकपदे रिक्त असून त्याचा विपरित परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होऊ शकतो. त्यामुळे सर्व रिक्त पदे तात्काळ भरणे आवश्यक असल्याचे सर्वांनी मत व्यक्त केले.
शिक्षणाच्या झपाट्याने बदलणा-या ध्येय धोरणांमुळे शिक्षण क्षेत्रात अनेक आव्हाने निर्माण होत असताना आव्हानांना समर्थपणे झेलण्यासाठी शिक्षकांनी संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे रहायला हवे.असे प्रतिपादन पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांनी केले.

 

संघटनेचे राज्य नेते विजय भोगेकर म्हणाले, शिक्षकांना आपल्या प्रश्नांना संघटनेच्या माध्यमातून वाचा फोडण्यासाठी लोकप्रतिनिधींचे सहकार्य मिळविणे अत्यंत आवश्यक असून संघटनात्मक कामात स्वतःला झोकून देऊन काम करणे गरजेचे बनले आहे, महिला राज्याध्यक्षा अलका ठाकरे म्हणाल्या, पुरोगामी शिक्षक संघटनेत महिलांना सन्मानाचे स्थान असून मोठ्या विश्वासाने सर्व जिल्ह्यात महिलांचेही विविध उपक्रम सातत्याने होतात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. राज्य सरचिटणीस हरिश ससनकर म्हणाले शिक्षक व विद्यार्थी यांच्या समस्यांबाबत पुरोगामी शिक्षक संघटनेच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात येऊन शिक्षकांना व विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न असतो. मार्गदर्शक शंकरराव पाटील म्हणाले, संघटनेसाठी त्याग महत्त्वाचा असून कार्यकर्त्यांनी संघटनात्मक कार्यासाठी वेळेसह आर्थिक योगदान देणे क्रमप्राप्त ठरले आहे.

सभेत जुनी पेन्शन योजना लागू करणे, डी सी पी एस कपातीचा हिशोब देणे, एम एस सी आय साठी मुदत वाढ शासन निर्णय व्हावा, राज्यभर रखडलेल्या पदोन्नती पार पाडणे, राज्यातील रिक्त पदांवर शिक्षक भरती प्रक्रिया राबविणे, दहा, वीस , तीस आकृतीबंध शिक्षकांना लागू करणे, एकस्तर वेतन लागू करणे, बी डी एस प्रणाली अखंडपणे सुरू ठेवणे, विद्यार्थी उपस्थिती भत्त्यात वाढ करावे, शा.पो.आहार नोंदी व अन्य कामे स्वतत्र यंत्रणेला द्यावीत, शालार्थ मधील बंद केलेल्या टॅब सुरु करणे, मुख्यालयी राहण्याची अट शिथिल करणे, संपकालीन वेतन कपात परत करणे, निवडश्रेणीची वीस टक्के अट शिथिल करणे, राज्य व जिल्हा शिक्षक पुरस्कार वेतन वाढ सुरू ठेवणे,मनपा शाळा शिक्षकांच्या वेतनासाठी शंभर टक्के अनुदान देणे.वेतन आयोग हप्ता थकबाकी साठी निधी पुरविणे, विद्यार्थी उपस्थिती भत्त्यात वाढ करणे, आदी महत्वपूर्ण विषयांवर चर्चा होऊन सदर मागणीसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे ठराव करणेत आले.

दरम्यान संघटनेचे नुतन राज्यकार्याध्यक्ष प्रकाश पाध्ये (रत्नागिरी), पी.एच.डी.उत्तीर्ण झाल्याबद्दल महिला राज्याध्यक्षा अलका ठाकरे (चंद्रपूर), कोल्हापूर नुतन जिल्हा नेते शंकरराव पवार, नुतन जिल्हा सरचिटणीस तुषार पाटील, नूतन रत्नागिरी नेते प्रदिप पाटील, जिल्हाध्यक्ष यशवंतराव पेढांबकर, शिष्यवृत्ती व सैनिक स्कूल परीक्षेत उल्लेखनीय कार्य केलेल्या करवीर महिला सरचिटणीस नकुशी देवकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

बैठकीस राज्य नेते विजय भोगेकर(चंद्रपूर), सरचिटणीस हरिश ससनकर(चंद्रपूर), राज्य कार्याध्यक्ष प्रकाश पाध्ये (रत्नागिरी), महिला राज्याध्यक्षा अलका ठाकरे (चंद्रपूर) महिला राज्यसरचिटणीस शारदा वाडकर (कोल्हापूर), राज्य महिला सल्लागार,चंदा खांडरे (चंद्रपूर) राज्य उपाध्यक्ष जी एस मंगनाळे,दिलीप भोई,राज्य उपाध्यक्षा प्रमिला माने, अनिल मोहिते, राज्य संघटक पी आर पाटील राज्य संघटक, मालती राजमाने या़च्यासह
*चंद्रपूर जिल्हाध्यक्ष* किशोर आंनदवार, *सरचिटणीस* सुरेश गिल्लोरकर *,जि.कार्याध्यक्ष* -गंगाधर बोडे.*रायगड जिल्हाध्यक्ष* -वसंत मोकल, *उपाध्यक्ष*-संदिप कोळी,*कार्याध्यक्ष* -विश्वास ठाकूर, *खजिनदार* – सुनिल देशमुख, *सल्लागार* -दयानंद मोकल, *सरचिटणीस* -सुनिल मोरे
*रत्नागिरी जिल्हाध्यक्ष* यशवंत पेढांबकर, *जिल्हा नेते* प्रदिप पवार **जिल्हा उपाध्यक्ष**विनोद घडशी , चिपळूण तालुका अध्यक्ष -शशिकांत सपकाळ, *सरचिटणीस**सुरेश धुमाळ, *सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष* सचिन जाधव, *वाशिम जिल्हाध्यक्ष* -इरफान मिर्झा, सरचिटणीस-प्रदिप गावंडे ,*गोंदिया म.अध्यक्षा*-प्राजक्ता रणदिवे
*म.सरचिटणीस*- जयश्री सिरसाटे, *सांगली जिल्हाध्यक्ष* -दिवाणजी देशमुख, *जि.पदाधिकारी* तानाजी किटे, *नांदेड जिल्हा नेते-* अशोक मोरे, *उपाध्यक्ष -* माधव भालेराव *सातारा जिल्हाध्यक्ष -* चंद्रकांत मोरे, *कोल्हापूर जिल्हा नेते* शंकर.पवार, *जिल्हाध्यक्ष* -एस के पाटील *सरचिटणीस* तुषार पाटील, *म.जिल्हा सरचिटणीस**अलका थोरात, *जिल्हा सल्लागार*-आर एस पाटील, गोविंद पाटील *कार्याध्यक्ष* -सुनिल पोवार, *जि.प्र प्रमुख**के एस पाटील ,*जिल्हा उपाध्यक्ष* -झहीर जमादार, प्रभाकर चौगुले, बाबा रणसिंग, घनश्याम तराळ, एन एस पाटील,बी एस पाटील, श्रीकांत टिपुगडे, बाबू केसरकर, शशिकांत पोवार, प्रेरणा चौगुले, नकुशी देवकर, सुनिता पाटील आदी.पदाधिकारी उपस्थित होते.
अशोक खाडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.प्रकाश पाध्ये यांनी आभार मानले.