पाण्याच्या टाकीत पडलेल्या अस्वलीच्या पिल्याला रेस्क्यू करून केले निसर्गमुक्त,,बल्हारशाह पॉवर हाऊस परिसरातील घटना #बल्हारशाह वनविभागाची कारवाई#

324

 

राजुरा(संतोष कुंदोजवार)

दिनांक 01.06.2023 ला सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास बल्हारपुर – चंद्रपुर मार्गावरील महापोरपण (पावर हाऊस) चे परिसरातील खाली पाण्याच्या टाकीत अस्वल वन्यप्राणी पडल्याची माहिती महापारेषण विभागाचे कर्मचारी यांचे कडुन वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह यांना प्राप्त झाली. माहिती प्राप्त होताच वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह हे अधिनस्त कर्मचारी यांचे सह मौका स्थळी तात्काळ हजर होवुन अस्वल या वन्यप्राण्यास बेशुध्द करुन पाण्याच्या टाकीतुन बाहेर काढले व त्यानंतर रेस्क्यु करण्यात आलेली अस्वल या वन्यप्राण्याची कुंदन पोडचलवार, पशुवैद्यकीय अधिकारी, वन्यजीव उपचार केन्द्र ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपुर यांनी तपासणी केली असता अस्वल हि मादी असुन तिचे वय अंदाजे 3 वर्षे इतके होते व ती सुदृढ असल्याने सदर अस्वल या वन्यप्रण्यास निसर्ग मुक्त करण्याबाबत पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सुचना दिल्या.

मध्य चांदा वनविभागचे उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, सहाय्यक वनसंरक्षक श्रीकांत पवार यांचे मार्गदर्शनात व श्री. शेंडगे, परिविक्षाधिण सहाय्यक वनसंरक्षक यांचे उपस्थितीत सदर मोहीम यशस्वी करण्याकरीता वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे, क्षेत्र सहाय्यक के एन घुगलोत वनरक्षक कु. वर्षा पिपरे, सुधीर बोकडे, आर. आर. शिवणकर व अति शिघ्र दल, कोठारी व चंद्रपुर येथील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले त्यामुळे अस्वल या वन्यप्राण्यास नविन जिवनदान मिळाला व तिला वनात निसर्ग मुक्त करण्यात आले.